'महाविकास'चे हे सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर सरकार : फडणवीसांचा घाणाघात

या सरकारमध्ये खंडणीखोरीची स्पर्धा लागली आहे. छोट्यातील छोट्या पोस्टींगमध्ये Small Posting पैसा घेतला जात आहे. आपले सरकार राहिल की नाही, असे मंत्री Minister, पदाधिकारी व नेत्यांना वाटते त्यातून ते जेवढे काढता येईल तेवढे काढा, अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis

sarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अनाचार, व्यभिचार, बलात्कार यांचे नवीन रेकॉर्ड तयार करत आहे. तिघांच्या टोळीने राज्य चालवण्याचा प्रकार सुरू आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर सरकार आहे. या सरकारमध्ये खंडणीखोरीची स्पर्धा लागली आहे, अशी घाणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात असे सरकार आहे, ज्यांच्या काळात अनाचार, व्यभिचार, बलात्कार यांचे नवीन रेकॉर्ड हे सरकार तयार करत आहे. तिघांच्या टोळीने राज्य चालवण्याचा हा प्रकार आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर सरकार आहे. या सरकारमध्ये खंडणीखोरीची स्पर्धा लागली आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadanvis</p></div>
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मार्चपर्यंत मिळणार: अजित पवार,पाहा व्हिडिओ

छोट्यातील छोट्या पोस्टींगमध्ये पैसा घेतला जात आहे. आपले सरकार राहिल की नाही, असे मंत्री, पदाधिकारी व नेत्यांना वाटते त्यातून ते जेवढे काढता येईल तेवढे काढा, अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. सरकारी आशीर्वादाने अनेक अवैध गोष्टी चालल्या आहेत. मंत्र्यापासून पदाधिकारी, आमदार यामध्ये गुंतले आहेत. जनतेला न्याय देण्यासाठी यांच्या भांडणे नसुन हिस्से, वाटणीसाठी भांडणे होत आहेत. आता जो भष्टाचार पहायला मिळतो, त्यामध्ये नोकरशाही टोकाची भ्रष्टाचारी होत आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadanvis</p></div>
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामांचे कधीही समर्थन करत नाही...

यापूर्वी असे नव्हते. महाराष्ट्रातील नोकरशाही एक उत्तम उदाहरण होते, आज ती भ्रष्टाचारी बनली आहे. लोकांना व सर्वसामान्यांना त्रास देऊन वसुली चालली आहे. या विरोधात आपल्याला संघर्ष करावा लागेल. युवा मोर्चाला जनतेचा आवाज बनावे लागेल, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. आपण उभे केलेल्या ७० टक्के उमेदवार निवडून आले आहेत. त्यावर जनतेचा विश्वास आहे. पण, तीन नापास विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. जनतेचा विश्वास घात करून हे सत्तेवर आलेल आहेत. पण शेतकऱ्यांवर संकटे येऊनही मदत केली जात नाही. केंद्राने आठ हजार कोटी रूपये वाटपासाठी दिले पण, ते देखील यांनी वाटले नाहीत. इतके हे भयाव सरकार आहे, असेही श्री. फडणवीस यांनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com