हा तर मुंबई महापालिकेसाठी भाजपचा डाव

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी मुंबई महापालिका निवडणुकी विषयी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेनेत फुट पडली आहे. शिवसेनेचा एक गट भाजपच्या गोटात गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांत कटुता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी मुंबई महापालिका निवडणुकी विषयी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ( This is the BJP's instinct for Mumbai Municipal Corporation )

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे काही घडणार अशी कल्पना होती. कारण भाजपला शिवसेना संपवून मुंबई महापालिका काबिज करायची होती. कारण मुंबई महापालिका ही अनेक राज्यांपेक्षा मोठी सत्ता आहे. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेवर सत्ता असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिल्लीच्या सूचनेवरून हे ऑपरेशन सुरू झाले," असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Prithviraj Chavan
त्या देशांनी पंतप्रधानांना हाकलले; ती स्थिती भारतात येऊ शकते...पृथ्वीराज चव्हाण

ते पुढे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे दररोज दिल्लीत जाऊन आदेश घेऊन येत आहेत. काही तात्त्विक पाठिंबा मिळवत आहेत. त्यांनी विधानपरिषद व राज्यसभा निवडणुकीत लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. ते आता बेदरकारपणे शिवसेना संपवायला निघाले आहेत," असा आरोप त्यांनी केला.

Prithviraj Chavan
सोनिया गांधी, राहुल गांधींना मिळालेल्या ईडीच्या नोटिसीवर पृथ्वीराज चव्हाण, म्हणाले...

अंदाज असताना तुम्ही कोणती सावधगिरी घेतली असे विचारले असता त्यांनी सांगितले की, "आम्हाला अंदाज आला होता. आम्ही सावध होतो. मात्र ईडी बाबत जो मोठा खेळ झाला. दहशत, पैसे, निवडणुकीत मते फोडण्याचा प्रयत्न वगैरे गोष्टी त्यांनी केल्या. या गोष्टी लोकशाहीत अभिप्रेत नाहीत. मात्र या गोष्टींना तोड द्यावे लागेल. भाजपने कोणत्या प्रकारचे राजकारण करावे, हे आम्ही त्यांना सांगू शकत नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com