राज्यसभा निवडणूक : हे ११ आमदार ठरवणारं विजय भाजपचा की शिवसेनेचा...

Rajysabha Election | घोडेबाजार झाला तर याच ११ आमदारांभोवती फिरणार हे जवळपास निश्चित!
Dhananjay Mahadik, Sanjay Pawar Latest Marathi News
Dhananjay Mahadik, Sanjay Pawar Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत ६ जागांसाठी ७ अर्ज आल्यामुळे चुरस सध्या चांगलीच वाढली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार ७ पैकी भाजपच्या (BJP) २, शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्या प्रत्येकी १ अशा ५ जागा निवडून येणार आहेत. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना रिंगणात उतरवलं आहे. विजयासाठी शिवसेनेला स्वतःची, काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अतिरिक्त मत वगळता विजयासाठी आणखी १५ मतांची गरज आहे. (Rajysabha Election latest news)

भाजपची अधिकृत अशी १०६ मते आहेत. विजयी मतांच्या कोट्यानुसार भाजपचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतर भाजपकडे जादा २२ मते शिल्लक राहतात. त्यामुळे भाजपला विजयासाठी आणखी ३० मतांची आवश्यकता आहे. या सगळ्या गणितांमुळे सध्या राज्यातील छोट्या पक्षांचा आणि अपक्ष अशा २९ आमदारांचा भाव वधारला आहे.

या २९ आमदारांपैकी राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे, रवी राणा, विनोद अगरवाल, महेश बालदी, रासपचे रत्नाकर गुट्टे आणि जनसुराज्यचे विनय कोरे अशा ७ आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार २, स्वाभिमानी शेतकरी संघटना (निलंबित) १, शेकाप १, अपक्ष ८ अशा १७ आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.

भाजपचा महाविकास आघाडीच्या त्या ११ मतांवर डोळा :

भाजपची स्वतःची शिल्लक २२ आणि पाठिंबा दिलेल्या ७ आमदारांची मत वगळता तिसऱ्या जागेसाठी आणखी १३ मतांची गरज आहे. यात मनसेच्या एकमेव आमदारांचे मत सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित १२ मतांसाठी भाजपची नजर महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या त्या १७ पैकी ११ आमदारांवर आहे.

प्रहारचे २, शिवसेनेच्या सहयोगी आमदार गीता जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांचे २ आणि अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांचे १ अशी ६ मत महाविकास आघाडीला मिळण्याचे जवळपास निश्चित आहे.

मात्र बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, शेकाप १ आणि अपक्ष आमदार ५ अशा एकूण ११ मतांवर भाजपची नजर आहे. या अपक्ष आमदारांमध्ये मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार यांचा समावेश आहे. तर कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे आमदार विनोद निकोले यांचे मत महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे तर एमआयएम त्यादिवशी गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेले मात्र अद्याप भूमिका जाहीर न केलेले ते ११ आमदार विजय भाजपचा होणार की शिवसेनेचा हे ठरवणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com