NCP Vs Shinde : शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही - महेश तपासे

राष्ट्रावादी काँग्रेसचे ( NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली.
NCP Mahesh Tapase
NCP Mahesh Tapasesarkarnama

NCP Vs Shinde : मुंबई - राज्यात सत्ता परिवर्तन होऊन महिना झाला आहे. तरीही राज्यातील मंत्रीमंडळात केवळ दोनच मंत्री आहेत. हे मंत्रीमंडळ बेकायदेशीर असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत असतो. यातच मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. यावर राष्ट्रावादी काँग्रेसचे ( NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली.

NCP Mahesh Tapase
बुलेट ट्रेनला तातडीची मंजुरी; हा तर गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार... महेश तपासे

महेश तपासे म्हणाले की, मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असे जवळजवळ २० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मुहुर्त मिळेना आणि आजचाही मुहुर्त टळला आहे असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली नाही, शिवाय शेतीचे सरकारकडून अद्याप पंचनामे पूर्ण केलेले नाही. द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला असताना मंत्रीमंडळाचा विस्तारही होईना ही दुर्दैवी बाब आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

NCP Mahesh Tapase
बंडखोरांचा खर्च गॅस दरवाढीतून वसुल करणार का....महेश तपासे

हे शिंदे सरकार संविधानिक आहे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात दावे - प्रतिदावे सुरू आहेत. तिकडे सगळा वेळ दोघांच्या सरकारला द्यावा लागतो आहे मात्र राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला मदत किंवा दिलासा द्यायला वेळ नाही, असा आरोप करतानाच शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in