Eknath Shinde | Arjun Khotkar | Eknath Shinde
Eknath Shinde | Arjun Khotkar | Eknath Shinde Sarkarnama

ठाकरेंची साथ सोडताना नेते ढसाढसा रडले पण कठोर निर्णयावर ठाम राहिले...

Uddhav Thackeray | Shivsena | अजूनही शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे.

मुंबई : शिवसेनेतील ऐतिहासिक बंडाला आता जवळपास चाळीसहुन अधिक दिवस झाले. या दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार जावून भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार सत्तेत आले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. शिवाय शिवसेनेच्या १८ पैकी १२ म्हणजे दोन तृतीयांश खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान अजूनही शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे.

आज अत्यंत भावनिक होत माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) शिंदे गटात सहभागी झाले. ठाकरेंची साथ सोडत असल्याचे सांगतना ते अक्षरशः ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले. 'परिस्थितीनुसार मी हा निर्णय घेत आहे, असल्याचे ते म्हणाले. शिंदे गटात जाण्याबाबत मी उद्धव ठाकरेंकडेही परवानगी मागितली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खोतकर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून होते. काल सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे त्यांना शिंदे गटात सामावून घेण्यासाठी मध्यस्ती करीत असल्याची चर्चा होती. खोतकरांची मनधरणी करण्यासाठी सत्तारांनी काल दिल्ली गाठली होती.

खोतकर यांच्याशिवाय यापूर्वीही काही नेत्यांनी रडत रडत ठाकरेंची साथ सोडली. तर काहींनी ठाकरेंसाठी रडल्यानंतरही ठाकरेंचीच साथ सोडली. पण साथ सोडली हे नक्की.

संतोष बांगर :

कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे अत्यंत शेवटच्या क्षणी शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यापूर्वी ते ठाकरे गटात होते. आमदार बांगर यांनी आपण कुठेही जाणार नाही, शिवसेना सोडणार नाही असे २४ जुन रोजी स्पष्ट केले होते. त्यांच्या या निर्णयाचे सर्व शिवसैनिकांनी स्वागत केले, जाहीर सत्कार समारंभ पार पडले. याच सत्कारावेळी बोलताना बांगर यांना अश्रु अनावर झाले होते. बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करत त्यांनी सर्व उपस्थितांच्या साक्षीने वातावरण गलबलून टाकले होते. मात्र त्यानंतर दहा दिवसांमध्येच बंडखोर करत बांगर यांनी ठाकरेंची साथ सोडली.

एकनाथ शिंदे :

ठाकरेंची साथ सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अश्रु अनावर झाले होते. विधानसभेत बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उत्तरादाखल करण्यात आलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आज मी मुख्यमंत्री म्हणून बोलतोय यावर विश्वास बसत नाही. महाराष्ट्रात सत्तात्तर ही ऐतिहासिक घटना आहे. या ऐतिहासिक घटनेची ३३ देशांनी नोंद घेतली. ज्यावेळी मी बंडाचे मिशन सुरु झाले तेव्हा मला कोणी विचारले नाही, कुठे चाललो आहे, या आमदारांचा माझ्यावर विश्वास होता,"

"शिवसेनेमध्ये माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा मी ठरवलं की लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही, मी बंड केल्याने काहींनी माझा बाप काढला. पण शिंदेंच्या घरावर दगड मारण्याची कुणामध्ये हिम्मत नाही. मी शांत आहे, पण अन्याय झाला तर मी सहन करीत नाही. माझी दोन मुले माझ्या डोळ्यासमोर गेली. त्यावेळी मला आनंद दिघे साहेबांनी आधार दिला," हे सांगतांना मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर झाले होते. शिवाय गुजरातला जाताना आणि गुजरातला गेल्यावरही त्यांना रडू कोसळल होतं, अशी आठवण अनेक आमदारांनी सांगितली आहे.

दादा भुसे :

बहुमत चाचणीवेळी बोलताना 'आम्ही सत्ता सोडून गेलो तरी आमचे मन कसे कळाले नाही'. 'तुमची माणसे दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटले गेले आहे', आमचा बंड नाही, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला, अशा शब्दांत माजी मंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) सभागृह दणाणून सोडले होते.

गुलाबराव पाटील बोलत असतानाच त्यांच्या मागे बसलेल्या दादा भुसे (Dada Bhuse) यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. दादा भुसे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. गुलाबराव यांच्या पाठिमागे भुसे बसलेले असल्यामुळे सभागृहातील कॅमेऱ्यांनी ते दृष्य टिपले.

रामदास कदम :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण त्याआधीच त्यांनी नेतेपदाचा राजीनामा देत आपणच शिवसेना (Shivsena) सोडत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र पक्षाची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत कदम यांना पुन्हा नेतेपद दिले. पण हकालपट्टीमुळे कदम चांगलेच निराश झाले होते. शिवसेनेसाठी आम्ही ५२ वर्ष सर्वकाही केले, असे सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com