महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कठोर 'शक्ती कायदा' येणार....

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच धार्मिक विधी व उत्सवांना महाराष्ट्रात मर्यादा घातलेल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कठोर 'शक्ती कायदा' येणार....
There will be a very strict 'Shakti Act' for the safety of women ....

सातारा : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अत्यंत कठोर असा शक्ती ॲक्ट तयार करण्यात आला आहे. हा ॲक्ट सध्या दोन्ही सभागृहाच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे. दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या सूचनांचा त्यामध्ये अंतर्भाव करून लवकरच हा शक्ती ॲक्ट लागू केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. There will be a very strict 'Shakti Act' for the safety of women ....

तासगाव येथील रथोत्सवासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. साकेनाकावर घडलेल्या घटनेविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, Cctv पाहून यात जे कोणी सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यातील मुख्य आरोपी पकडला गेलाय. त्याच्याकडून माहिती घेऊन कठोर कारवाई केली जाईल. 

घटनेतील वाहनही जप्त केलेले आहे. फॉरेन्सिकच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जाईल. तसेच सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून यामध्ये सामील प्रत्येकाला पकडले जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अत्यंत कठोर असा शक्ती ॲक्ट तयार करण्यात आला आहे. हा ॲक्ट सध्या दोन्ही सभागृहाच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे. दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या सूचनांचा त्यामध्ये अंतर्भाव करून लवकरच हा शक्ती ॲक्ट लागू केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच धार्मिक विधी व उत्सवांना महाराष्ट्रात मर्यादा घातलेल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली आहे. आज दुसरे वर्षे तासगांवचा रथोत्सव धार्मिक विधी पूर्ण करून परंपरा जपण्याचे काम केले आहे. गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे, कोरोनाचे संकट पूर्ण दूर व्हावे, पुन्हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. पुढच्यावषी हा रथोत्सव चांगल्या प्रकारे सर्व कार्यक्रमांसह साजरा करता यावा, अशी प्रार्थना करतो. 

लालबागच्या कालच्या प्रकरणात एका पत्रकाराविषयी पोलिस अधिकाऱ्यांनी जे केले त्याची चौकशी होईल. पत्रकारांना जे पोलिसांनी बोलले त्याचे मी समर्थन करणार नाही. ते चुकीचेच आहे. अधिकाऱ्यांनी का तसे केले हे पाहून नंतरच योग्य ती बोलणे उचित होईल आणि चौकशी केली जाईल. तसेच पोलिसांनी मास्क घातला नसेल तर ती बाब गंभीर असून त्यांची दखल घेतली जाईल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.