दिवाळीनंतर राज्यात प्रशासकीय फेरबदल ; शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय...

मागील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यातील नाराजीनाट्याची चर्चाही रंगली होती.
Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath Shinde
Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath ShindeSarkarnama

Shinde- Fadanvis news मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यापासून मोठमोठ्या हालचाली होत आहेत. प्रशासकीय बदल्या हा देखील त्याचाच एक भाग आहे. असे असताना येत्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रशासकीय बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह मंत्रालयातील सचिव आणि इतर उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती समोर आली आहे. IAS, IPS यांच्या बदल्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. मागील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यातील नाराजीनाट्याची चर्चाही रंगली होती.

Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath Shinde
Good News: रद्दीवाले कुतुबुद्दीन यांनी दिवाळीत वाटली दहा टन साखर!

पण आता दिवाळी संपल्यावर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय फेरबदल होणार आहेत. प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील मोठ्या महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी इत्याही पदावर मोठे फेरबदल होणार आहेत

वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसह राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल होणार आहेत. यासोबतच मंत्रालयातील सार्वजानिक बांधकाम विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी, महसूल, गृह, वित्त, यादेखील बदल्या होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील पुणे , नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, अकोला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बदल्या होऊ शकतात. त्याचबरोबर पोलीस आयुक्त, डीआयजी, आयजी या पदांवर मोठे फेरबदल होण्याची आहे. पुढील काही दिवसातच या बदल्या होऊ शकतात.

दिवाळीपूर्वीही राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले होते. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचीचर्चा रंगली होती. गृह मंत्रालयाने 20 ऑक्टोबर रोजी अचानक आदेश काढत राज्यभरातील 23 वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्य पोलीस सेवेतील दोन अशा 25 अधिकाऱ्यांच्या नवीन बदल्या करण्यात आल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com