Ramdas Kadam News : 'माझ्या मुलाचा अपघात घडवण्याचा कट होता'; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

गेल्या आठवड्यात शुक्रवारी (६ जानेवारी) योगेश कदम यांचा रात्रीच्या सुमारास अपघात झाला
Ramdas Kadam News :
Ramdas Kadam News :

Ramdas Kadam News : माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या मुलाचा म्हणजेच शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार योगेश कदम यांचा अपघात घडवून आणण्याचा कट होता असा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी (६ जानेवारी) योगेश कदम यांचा रात्रीच्या सुमारास अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ कशेडी घाटात हा अपघात झाला. यात योगेश कदम यांच्यासह त्यांचा वाहनचालक आणि तीन पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली असतानाच रामदास कदम यांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ उडाली आहे.

Ramdas Kadam News :
Bhandara : राजकीय नेते लावत होते शासनाला चुना, तहसीलदारांच्या चौकशीत सापडले !

योगेश कदम यांचा अपघात घडवून त्यांना गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता. पण अपघातानंतर योगेश कदमांची गाडी सुदैवाने पोलिसांच्या गाडीला धडकली आणि कट फसला, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

आमदार कदमांच्या अपघातप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. चालकाने ब्रेक फेल झाल्याचे जबाबात सांगितलं. पण गाडीची तपासणी केल्यानंतर ब्रेक फेल झालेच नसल्याचे समोर आलं. चालक खोटं बोलतोय. पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असतानाही त्या डंपरने योगेश कदमांच्या मधल्या गाडीला दीडशे फुटापर्यंत रेटत नेली. त्यांची गाडी आणखी थोडी पुढे गेली असती तर दरीतच कोसळली असती. असाच प्लॅन असावा, असं मला वाटतं. योगेश कदमांची गाडी पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाडीली धडकली नसती तर त्याची गाडी खोल दरीत कोसळली असती,” अशी शंकाही रामदास कदम यांनी व्यक्त केली.

“ पण आमचं नशीब चांगलं म्हणून माझा मुलगा बचवला. पण गाडीचा चालक खोटं बोलतोय, हे सिद्ध झालं. आता पोलिस त्या वाहन चालकाच आतापर्यंतचं सर्व रेकॉर्ड तपासत आहेत.त्यासाठी दोन पथकं काम करत आहे.,” असही रामदास कदम यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in