Mantralaya Glasses Broken: मंत्रालय परिसरात अचानक गाड्यांच्या अन् खिडक्यांच्या काचा फुटल्या; नेमकं काय घडलं ?

Mantralaya Window Glass Broken News: मेट्रोच्या कामादरम्यान लहान लहान सुरुंग लावले जात असल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
Mantralaya Window Glass
Mantralaya Window GlassSarkarnama

Mumbai Mantralay News: मुंबईत मंत्रालय परिसरात उभा असलेल्या काही गाड्यांच्या काचा आणि मंत्रालय परिसरातील इमारतीच्या काचा अचानक फुटल्याची घटना समोर आली आहे. मेट्रोच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. मात्र, सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. मेट्रो सबवेच्या कामादरम्यान लहान लहान सुरुंग लावले जातात. याचवेळी अनेक दगड थेट मंत्रालय परिसराच्या दिशेने आल्याने पार्किंगमधील गाड्यांच्या काचा फुटल्या.

Mantralaya Window Glass
INDIA Logo : 'इंडिया'चा 'लोगो' कसा असणार ? नेत्यांच्या गुप्ततेमुळे उत्सुकता शिगेला !

मंत्रालय परिसरातील काही इमारतीच्या देखील काचा अचानक फुटल्याने खळबळ उडाली. मात्र, मेट्रोच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यामुळे या कामाच्यावेळेस सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in