पोलिसांच्या गाडीला दे धक्का...मग गुन्हेगारांना कसे पकडणार?

Police : गस्तीसाठी जाणाऱ्या गाड्यांचीच अवस्था झाली दे धक्का अवस्था...
Dombiwali -Kalyan Police News
Dombiwali -Kalyan Police NewsSarkarnama

डोंबिवली : कल्याण पोलिसांच्या ताफ्यात काही महिन्यांपूर्वीत नव्या बोलेरो गाड्या सामील झाल्या असून या गाड्यांचा वापर गस्तीसाठी करण्यात येत आहे. तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या गाड्या देण्यात आल्या. मात्र या गाड्यांत सतत बिघाड होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. यामुळे पोलिसांची भर रस्त्यावर पंचाईत होत आहे.

दरम्यान, कल्याण येथील पोलिसांच्या (Police) ताफ्यातील ही बोलेरो गाडी मंगळवारी (ता.१५ नोव्हेंबर) बंद पडल्याने पोलिसांनाच या गाडीला धक्का मारावा लागल्याचे दिसून आले. यामुळे गस्तीसाठी पोलिसांना मिळणारे वाहन, असे कधीही बंद पडले तर गुन्हेगारांना पकडायचे कसे,असा मोठा प्रश्न खुद्द पोलिसांसमोरच उभा राहीला आहे. (Dombiwali -Kalyan Police News)

Dombiwali -Kalyan Police News
`आव्हाड` प्रकरणाने सरकारची प्रतिष्ठा वाढली का?

कल्याण मधील एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना राऊंडला जायचे असताना त्यांची गाडी अचानक बंद पडली. खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडीला धक्का मारत वाहन चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते वाहन सुरु झाले नाही. याविषयी विचारणा केली असता पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडीची बॅटरी खराब झाली असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. मात्र गस्तीसाठी मिळालेली नवीन वाहने वारंवार बंद पडत असल्याने पोलिसांच्या नाकी नऊ आल्याचे दिसून येते आहे.

Dombiwali -Kalyan Police News
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'मी शिवबंधन तोडायला तयार, पण....'

दरम्यान, नव्या गाड्यांच्या बॅटरीविषयी तक्रारी येत असून काही वाहनांच्या बॅटरी या कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी अत्यावश्यक साधन म्हणून पोलिसांच्या ताफ्यातील वाहनांकडे पाहिले जाते. गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचीच अवस्था दे धक्का असेल तर गुन्हेगार हाती कसे लागणार?, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com