शिंदे सरकारचा उद्या शपथविधी; मात्र, पंकजा मुंडेंना फोन नाहीच

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पत्ता विधान परिषद निवडणुकीतही कापण्यात आला होता.
Bjp Leader Pankaja Munde News
Bjp Leader Pankaja Munde NewsSarkarnama

Pankaja Munde : मुंबई : शिंदे सरकारचा बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या (8 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहे. या आमदारांना सकाळीपासून फोन गेले आहेत. त्यातील काहीजन मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना फोन आलेला नाही, अशी माहिती मिळत आहे.

Bjp Leader Pankaja Munde News
फडणवीसांची डिनर डिप्लोमसी; संभाव्य मंत्री सागर बंगल्यावर दाखल

पंकजा मुंडे यांचा पत्ता विधान परिषद निवडणुकीतही कापण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातही बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये तरी पंकजा यांना मंत्रीपद मिळणार का असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे. इतर नेत्यांना फोन आल्याची चर्चा आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना फोन आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या नावाची चर्चाही सध्या होत नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज रात्री हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले याची काही नावे समोर आली आहेत.

Bjp Leader Pankaja Munde News
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांना जळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ?

त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार हेही सागर बंगल्यावर पोहचले आहे. या संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com