Devendra Fadnavis: फडणवीस नाराजच? फेसबुक, ट्विटरवर अजूनही सर्वकाही जैसे थे!

देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी रात्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. शपथविधीच्या वेळी फडणवीस नाराज होते, हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही हेरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथविधीनंतर आपल्या ट्विटर, फेसबुकचे प्रोफाईल लगेच बदलले. पण अजूनही फडणवीस यांच्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

फडणवीस यांनी गुरूवारी संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे हे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली होती. तसेच आपण मंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचेही जाहीर केले होते. पण शपथविधीआधी अनेक राजकीय घडामोडी घडल्या अन् फडणवीस यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच जाहीर केलं.

Devendra Fadnavis Latest Marathi News
उदयपूरची घटना तुमच्यामुळेच, देशाची माफी मागा! सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्मांना फटकारलं

हे पद स्वीकारण्यास फडणवीस तयार नसल्याची माहिती भाजपमधील सुत्रांनीच दिली होती. पण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्यानं फडणवीस नाही म्हणून शकले नाहीत. त्यामुळे शपथविधीवेळी आणि नंतरही ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शपथविधीला आता जवळपास 17 तास उलटून गेले आहेत. पण त्यांनी अजूनही ट्विटर किंवा फेसबुकवर उपमुख्यमंत्री असा उल्लेख केलेला नाही. आधीचाच महाराष्ट्र सेवक एवढाच उल्लेख दिसत आहे. त्यामुळे फडणवीस अजूनही नाराज असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे.

Devendra Fadnavis Twitter
Devendra Fadnavis Twitter

दरम्यान, शपथविधीनंतर बोलताना शरद पवार म्हणाले होते की, मुख्यमंत्री राहिलेली शंकरराव चव्हाण हे नंतर माझ्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले होते. त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्री झालेले शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सुशीलकुमा शिंदे यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तरी त्यांनी नंतर मंत्री म्हणून काम पाहिले.

फडणवीस यांनी नंबर दोनची जागा का स्वीकारली का, हे कळत नाही. ते खूष नाहीत, हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण त्यांना त्यांच्या पक्षाचा आदेश आला आहे. ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. त्यांच्यावर आदेश पाळण्याचे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असावे, असं पवार म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in