'धनुष्यबाणा'साठी शिंदेंचा नवा डाव; ठाकरेंना धक्का बसणार?

शिंदे गटाचे आमदार (MLA) दिल्लीला जाणार असल्याची चर्चा
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : खरी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने ७ सप्टेंबरच्या सुनावणीदरम्यान, आयोगाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) निवडणूक आयोगासमोर हजर करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गट निवडणूक आयोगावर निर्णय घेण्यासाठी दबाव आणत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

निवडणूक आयोगाकडे म्हणणे मांडण्यासाठी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना २३ सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे २७ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी घेणाऱ्या घटनापीठाने निवडणूक चिन्हाबाबत तपशीलवार सुनावणी घेऊन आम्ही निर्णय घेऊ असे सांगितले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे सर्व आमदार दिल्लीत जाणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार निवडणूक आयोगासमोर परेड का करत आहेत? असा सवालही उपस्थित होत आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? बॅनरची जोरदार चर्चा

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करण्याची तयारी केली आहे. त्यांनी राज्यातील सर्व शिवसैनिकांकडून निष्ठा प्रमाणपत्र लिहून घेतले आहे. ते प्रमाणपत्र शिवसेनेकडून निवडणूक आयोगासमोर सादर केले जाऊ शकतात. ७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीत जोपर्यंत चिन्हाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत शिवसेनेचे चिन्ह असलेले 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने न्यायालयात केली होती. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निवडणूक चिन्हाबाबत तपशीलवार सुनावणी घेऊन आम्ही निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.

दरम्यान, निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जोपर्यंत न्यायालय आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेऊ शकतो की नाही हे ठरविणार आहे. त्या आधीच शिंदे गट निवडणूक आयोगासमोर आमदारांची परेड करणार असल्याने शिंदे गट निवडणूक आयोगावर दबाव आणत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
दसरा मेळाव्यासंदर्भात संजय राऊतांची शिवसैनिकांना महत्त्वाची सूचना?

२३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने पुढील सुनावणीपर्यंत कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीतही निवडणूक आयोगाने पुढील सुनावणीपर्यंत आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना केल्या होत्या. तरीही शिंदे गटाच्या आमदारांची परेड करणार असेल तर हा एक प्रकारे न्यायालयाचा अवमान असल्याचेही सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com