Eknath Shinde : शिंदे गटात नाराजी; चार मंत्री अन् सहा आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा टाळला?

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडात साथ दिलेल्या सर्व आमदार आणि खासदारांसह पुन्हा एकदा गुवाहटीला गेले आहेत.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडात साथ दिलेल्या सर्व आमदार आणि खासदारांसह पुन्हा एकदा गुवाहटीला गेले आहेत. शनिवारी सकाळी साडे-नऊ वाजता मुंबई विमानतळावरून शिंदेंसह त्यांचे समर्थक आजी-माजी आमदार, खासदार असे जवळपास १७८ सदस्य गुवाहटी गेले आहेत. मात्र, त्याचवेळी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ती चार मंत्री आणि सहा आमदारांनी मुख्यमंत्र्याचा दौरा टाळला.

मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), मंत्री तानाजी सावंत आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आमदार चंद्रकांत पाटील, महेश शिंदे, महेंद्र दळवी, तसेच खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे गुवाहाटी दौऱ्यावर गेलेले नाहीत. याशिवाय आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील (Kishore Patil), लताताई सोनवणे हे देखील दौऱ्यात नसल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Eknath Shinde News
बारणे अन् आढळरावांची मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला दांडी; दोघांनीही दिले 'हे' कारण

याबाबत काहींनी नियोजित कार्यक्रम, कोणी घरगुती कार्यक्रम तर काही जणांनी ग्रामपंचायत निवडणुका असल्याचे सांगितले. सर्वांच्या सोयीसाठी यापूर्वी या दौऱ्याची तारीखही बदलण्यात आली होती. आधी हा दौरा २१ नोव्हेंबर रोजी होणार होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, ही तारीख बदलून २६ नोव्हेंबर केली. त्यानंतरही अनेक जाणांनी दौऱ्याकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, दौऱ्याबाबत बोलताना सत्तार म्हणाले, नाशिकला कृषी प्रदर्शनाला आलो आहे. १ जानेवारीला सिल्लोड फेस्टिवल असल्याने मी गुवाहाटी गेलो नाही, माझी कोणतीही नाराजी नाही. आमच्यामध्ये कोणताही विसंवाद किंवा मतभेद नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चांगले करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर शिंदे हे गुवाहाटीला गेले होते. तेथील कामाख्या देवीला त्यांनी नवस केला होता. तो फळाला आला म्हणून तो फेडण्यासाठी ते पुन्हा आसामला (गुवाहटी) गेले आहेत. मात्र, आढळराव व बारणे हे त्यांच्याबरोबर नाहीत. म्हणून त्यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क केला. ते का गेले नाहीत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Eknath Shinde News
बोम्मईंचा सोलापूरवर दावा; आंदोलन करत, दौंड-कर्नाटकच्या बसला काळे फासणाऱ्यावर गुन्हा दाखल

त्यावर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे जाता आले नाही, असे बारणे यांनी सांगितले. तर, आढळराव पाटील हे दर रविवारी आपल्या निवासस्थानी जनता दरबार घेतात. अपवाद वगळता ते कधी तो चुकवित नाहीत. त्यामुळे आढळराव गुवाहाटीला गेले नसल्याचे समजले. मात्र, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com