मंत्रीमंडळाच्या विस्ताराला या महिन्यात मुहूर्त नाहीच !

Eknath Shinde शिंदे गटातील आमदारांना आणखी महिनाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde-Devendra Fadanvis
Eknath Shinde-Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची पूर्ण तयारी असली तरी भारतीय जनता पक्षाकडून विस्तारास अद्याप होकार मिळाला नसल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तातडीने होण्याची शक्यता नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे १५ सप्टेबरपूर्वी विस्तार होण्याची अपेक्षा असलेल्या शिंदे गटातील आमदारांना आणखी महिनाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde-Devendra Fadanvis
Shiv Sena : शिंदे-ठाकरे गटासह राजकारणात सर्वांनाच मिलिंद नार्वेकर हवेहवेसे का वाटतात ?

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या विस्तारात ज्यांना स्थान मिळाले नाही, अशा आमदारांमध्ये नाराजी आहे. १५ सप्टेबरपूर्वी तुम्हाला मंत्री करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या आमदारांना देण्यात आले होते. मात्र, भारतीय जनता पार्टीकडून विस्तारास अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे १५ सप्टेबर ही तारीख मुख्यमंत्र्यांना पाळता येण्याची शक्यता फारच कमी आहे.

Eknath Shinde-Devendra Fadanvis
Ajit Pawar : राज्यातील सत्तांतराचा बारामतीच्या विकासावर परिणाम होणार नाही

एकुण घडामोडी पाहता मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या विस्तारात सात कॅबिनेट मंत्री तर १७ राज्य मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. सात कॅबिनेट मंत्रीपदापैकी एकनाथ शिंदे गटाला किती मंत्रीपदे मिळतात तसेच सतरा राज्यमंत्रीपदांपैकी शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतील. हे येत्या काळात स्पष्ट होणार होईल, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विस्तारात शिंदे गटाकडून अधिक मंत्रीपदांची मागणी केली जाऊ शकते. शिंदे गटातील अनेकांना मंत्री आणि त्यातही कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा आहे. ज्यांना कधीच मंत्रीपद मिळण्याची शक्यता नव्हती. त्यांनादेखील किमान राज्यमंत्रीपद मिळावे, अशी आशा निर्माण झाली आहे.त्यातील अनेकांच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असली तरी या विस्तारानंतरदेखील काहीजणांची नाराजी कायम राहण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in