राज्यात कुठेच लोडशेडिंग नाहीच; महावितरणाचा दावा

Loadsheding| Maharashtra| Madhav Bhandari| महावितरणाच्या चार्टनुसार वीजमनिर्मिती पूर्ण प्रमाणात सुरु असून कुठेही लोडशेडिंग करत नसल्याचा दावा केला आहे.
राज्यात कुठेच लोडशेडिंग नाहीच; महावितरणाचा दावा
Madhav Bhandari

मुंबई : महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात किमान ६ ते १० तासांचे लोडशेडिंग आहे. पण महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवरील चार्टनुसार महाराष्ट्रात (Maharashtra) कुठेही लोड शेडिंग करण्यात आलेली नाही. एक एप्रिलपासून ते आजच्या तारखेपर्यतचा हा चार्ट आहे. वीजमनिर्मिती पूर्ण प्रमाणात सुरु असून कुठेही लोडशेडिंग करत नसल्याचा दावा महावितरणाने केला आहे. १ एप्रिल ते आजच्या तारखेपर्यंतचा हा दावा महावितरणाने केला आहे. मग एकीकडे महावितरणाचा दावा, दुसरीकडे राज्य सरकारची लोडशेडिंगची घोषणा आणि तिसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या भागात सुरु असलेले लोडशेडिंग, याचा अर्थ काय, असा सवाल भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच, जर महावितरणाकडे पुरेशी वीज आहे. महानिर्मितीकडे पुरेशी वीज आहे, वीज उत्पादन कमी झाले नाही, कोळसा नाही म्हणून प्लॅंट बंद झालेले नाही, मग वस्तुस्थिती काय आहे, खरंच महाराष्ट्रात वीज निर्मितीत कमतरता आहे का, असेल तर कोणत्या कारणाने आहे, जर कमतरता असेल तर सरकारने त्यावर काय कारवाई केली, असे अनेक सवालही माधव भंडारी यांनी उपस्थित केले आहेत.

Madhav Bhandari
दीपक पांडेंचा आधी नारायण राणेंशी आता राज ठाकरेंशी पंगा!

यातला दूसरा मुद्दा म्हणजे साधारणपणे ४ हजार ते १० हजार मेगा वॅटची तुट राज्य सरकार दाखवत आहे. राज्यातील कोणताही वीजनिर्मिती प्रकल्प कोळश्याच्या अभावी बंद नाही, असे महानिर्मीती प्रकल्पाचे म्हणणे आहे, पण जे वीज प्रकल्प बंद आहेत ते कोणत्या कारणाने बंद आहेत, ती दुरुस्तीसाठी किंवा दुसऱ्या कारणासाठी बंद आहे, पण कोळसा नाही म्हणून प्रकल्प बंद आहे असा एकही प्रकल्प महाराष्ट्रात नाही. मग राज्य सरकार चुकीची माहिती जनतेला देत आहे का? कोळशाच्या अभाव किंवा कोळसा टंचाईबाबत याबाबत राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी राज्य सरकारचे म्हणणे स्पष्ट करावे. ऊर्जामंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर, वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळश्याची टंचाई याबाबत कशा पद्धतीने निर्माण केली जाते आणि त्याला जबाबदार कोण, याबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागतील आणि आम्ही ते करु. यातून अनेक घोटाळेही बाहेर येतील.

३ रा मुद्दा म्हणजे आता ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जाते, महाराष्ट्रात सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. मग पुरेसा पाण्याचा साठा असताना वीज तोडली जाते आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होणार आहे, यातून शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. अतिशय छोट्या छोट्या रकमांसाठी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. भारनियमन करताना आपल्या आवडत्या भागात, म्हणजे बारामतीत मध्यरात्री ज्यावेळी कोणीही वीज वापरत नाही अशावेळी लोडशेडिंग आणि शेजारच्या सातारा, बाजूच्या नगर असूद्या, त्याठिकाणी मात्र दिवसा लोडशेडिंग, म्हणजे ज्यावेळी शेतकरी वीज वापरतात त्यावेळी बारामती सोडून इतर भागात लोडशेडिंग केली जाते. तर ज्यावेळी शेतकरी वीज वापरत नाहीत त्यावेळी बारामतीत लोडशेडिंग केली जाते, हा काय प्रकार आहे, की त्यातही डावे उजवे आहे. राज्य सरकारने वीज टंचाईच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये, असा इशाराही माधव भंडारी यांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या लोडशेडिंगमुळे शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत, शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेले रब्बीचे पिक घालवण्याचं काम राज्य सरकार या लोडशेडिंगच्या माध्यमातून करायला निघाले आहे. याचे गंभीर परिणाम राज्याच्या शेती क्षेत्रावर होणार आहे. या सरकारने आपल्या शुल्लक राजकारणासाठी आणि वीजखरेदी बाहेरुन करता यासाठी अशा तऱ्हेचा खेळ शेतकऱ्यांच्या जीवाशी करुन नये. राज्याच्या हिताचा विचार करुन हा विषय हाताळावा, असे आवाहन आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.