Sushma Andhare on Barsu : बारसूत आशिष देशमुखांची १८ तर अधिकाऱ्यांची ९२ एकर जमीन; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

Ashish Deshmukh : जमिनींचा गैरव्यवहार झाला असेल तर कारवाईची उद्योगमंत्र्याची ग्वाही
Sushma Andhare, Ashish Deshmukh
Sushma Andhare, Ashish DeshmukhSarkarnama

Barsu Refinery Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे करण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. सध्या या प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बोअरवेल घेण्यात येत आहे. या माती परीक्षणानंतर येथे प्रकल्प करायचा की नाही, हे ठरविण्यात येणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र हे परीक्षण होऊ न देण्यासाठी स्थानिकांनी भर उन्हात आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलकांवर पोलिसांवर लाठीचार्ज केला. तसेच आंदोलन ठिकाणी जाणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Sushma Andhare, Ashish Deshmukh
Barsu Refinery Protest : मोठी बातमी! बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित

स्थानिकांचा विरोध असतानाही सरकार हा प्रकल्प रेटत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. बारसू परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्याचा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केली आहे. त्यावर ग्रामस्थांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम होणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अनेक विकासकांमांना विरोध केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्वाचा असून तो मार्गी लावणार असल्याचेही सामंत म्हणाले.

Sushma Andhare, Ashish Deshmukh
Konkan News : रत्नागिरी लोकसभा शिंदे गटाकडे : उद्योगमंत्र्यांचे बंधू असणार उमदेवार, सामंतांचे संकेत; राणेंकडे लक्ष

दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी बारसू परिसरात दोन आयआरएस अधिकाऱ्यांच्या जमिनी असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. बारसूकडे जाणाऱ्या खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची गाडी अडविणाऱ्या अधिकाऱ्यांची बहिण शिंदे गटात पदाधिकारी आहेत. हा योगायोग आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच आयआरएस अधिकारी अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता यांची तब्बल ९२ एकर जमीन त्या परिसरात आहेत. अधिकाऱ्यांना एवढा पगार असतो का की ते ९२ एकर जमीन विकत घेऊ शकतात?"

Sushma Andhare, Ashish Deshmukh
Barsu Refinery Protest : बारसुत लाठीचार्ज झाल्याचे आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी फेटाळले; म्हणाले...

अंधारे यांनी माजी आमदार देशमुख (Ashish Deshmukh) यांचीही जमीन बारसू प्रकल्प परिसरात असल्याचा दावा केला आहे. अंधारे म्हणाल्या, सध्या भाजपच्या संपर्कात असलेले आणि काँग्रेसमधून राजिनामा देऊन बाहेर पडलेले माजी आमदार आशिष देशमुख यांची १८ एकर जमीन आहे." अंधारे यांनी केलेले आरोप उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी फेटाळले आहेत. तसेच जमिनींचा गैरव्यवहार झाला असेल तर कारवाई करण्याचे अश्वासनही त्यांनी दिले आहे.

Sushma Andhare, Ashish Deshmukh
Darwha APMC : ‘मविआ’ विरुद्ध शिवसेनेत (शिंदे गट) घमासान, भाजपला दाखवला बाहेरचा रस्ता !

उदय सामंत म्हणाले, "महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्याची जमीन तेथे असल्याचे पुराव्यानिधी सांगितल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची छाननी करू. आतापर्यंत ठाकरे गटाकडून अनेक प्रकल्पांना विरोध झाला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा प्रकल्प कुठला हे जाहिर करावे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com