covaxin
covaxin sarkarnama

Corona Update : 'कोव्हॅक्सिन'बाबत आनंदाची बातमी, पण राज्यात निर्माण झालाय पेच...

मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : कोरोनाच्या (Covid 19) तिसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे सरकारकडून वेगाने लसीकरण (Vaccination) करण्यावर भर दिला जात आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळून येत नाहीत. त्यातच कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस डेल्टा (Delta) विषाणूसह ओमिक्रॉन (Omicron) वरही परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. पण महाराष्ट्रात समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात सध्या दररोज सुमारे 7 ते 8 लाख लशींचे डोस दिले जात आहे. आतापर्यंत राज्यात 14 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासह ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाल्याने लसीकरणाचे प्रमाणही वाढत चालले आहे. पण महाराष्ट्र सरकारसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना लशींचा तुटवडा जाणवू लागला आहे.

covaxin
कोरोना चाचणी कुणाची करावी, कुणी करू नये? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोव्हॅक्सिन या लशीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत आमच्याकडे सातत्याने विचारणा होत आहे. आरोग्य मंत्र्यांसोबत व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत आम्ही कोव्हिशिल्डचे (Covishield) 50 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 40 लाख डोसची मागणी केली आहे. लसीकरण वाढवण्यासाठी ही मागणी कऱण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोविशिल्ड या लशीचे डोस सर्वाधिक देण्यात आले आहेत. तसेच कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. पण सध्या या लशीचा तुटवडा असल्याने मर्यादित केंद्रांवरच उपलब्ध करून दिली जात आहे. परिणामी, लसीकरणावर परिणाम होत आहे. कोरोनाच्या लाटेत लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोव्हॅक्सिन या लशीबाबत आनंदची बातमी आहे. ही लस डेल्टासह ओमिक्रॉन विषाणूवरही प्रभावी असल्याचे सिध्द झाले आहे.

ओमिक्रॉनसह डेल्टावर कोव्हॅक्सिन प्रभावी

भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन लशीचा बूस्टर डोस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटीबॉडी ओमिक्रॉनसह डेल्टा विषाणूचा संसर्ग वाढण्यापासून प्रभावीपणे रोखत असल्याचे सिध्द झाले आहे. डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव 100 टक्के तर ओमिक्रॉनचा 90 टक्के प्रभाव कमी होत आहे, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी लस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com