Maharashtra Budget Session : ...मग दावोसला जाण्याची गरजच काय? अजित पवारांचे सरकारला खडे बोल

State Government : राज्यपालांच्या अभिभाषणावरून सरकारला धरले धारेवर
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar : महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दावोसचा दौरा केला. तेथून राज्यासाठी एक लाख ३७ कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा ते करीत आहेत. मात्र त्यांनी सांगितलेल्या यादीत अनेक कंपन्या आपल्याच देशातील आणि राज्यातील आहेत.

त्या कंपन्याच्या प्रतिनिधींना येथेच बोलवून घ्यायचे होते. या कंपन्यासाठी दावोसला जाण्याची गरजच काय? असा परखड सवाल विरोधीपक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केला.

Ajit Pawar
Sanjay Raut : संजय राऊतांना कोविडचा 'डोस' मिळणार? पुण्यातील एका पदाधिकाऱ्यासह दोघांची चौकशी सुरू

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना सरकारच्या निदर्शनास अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्याचे पवारांनी प्रसार माध्यमांना सांगितले. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा, त्याचे फलीत, त्यावरील खर्च यावर प्रश्न उपस्थित केले. जनतेचा पैसा योग्य कारणासाठी वापरला गेला पाहिजे. तसेच दावोसला झालेल्या खर्चाची माहिती मागितल्याचेही पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
Bhandara : स्वतः पोलिसच भरवतात कोंबड बाजार, अन् तेसुद्धा चक्क फडणवीसांच्या जिल्ह्यात !

यावेळी पवार म्हणाले, "महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातून एक लाख रोजगार निर्मितीची क्षमता असलेले प्रकल्प गुजरातला गेले. त्या पार्श्वभूमीवर राज्यात त्याच ताकतीचे प्रकल्प आणू, असा सरकारने दावा केला होता. त्यानुसार राज्यातून प्रकल्प गेल्याची यादी आम्ही वाचून दाखविली. मात्र सरकारकडून राज्यात कोणते प्रकल्प आले, याची यादी मिळाली नाही. ती माहिती काढण्याचा प्रयत्न केला मात्र मिळाली नाही."

Ajit Pawar
Pune bypoll Election : चिंचवडची मतमोजणी होणार १४ टेबलांवर; ३७ फेऱ्यांसाठी लागणार १४ तास

यानंतर पवार यांनी दावोस दौऱ्यासाठी झालेल्या खर्चावरून सरकारला खडे बोल सुनावले. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "मुख्यमंत्री दावोसला स्पेशल विमानाने गेले. त्यासाठी वेगवेगळा प्रकारचा तेथे खर्च झाला. खर्चालाही काही मर्यादा असते. तेथे गेलेल्या शिष्टमंडळाच्या दोन-अडीच दिवसासाठी तब्बल ४० कोटी उडविले. दोन दिवसांसाठी ४० कोटी खर्च होणार असेल तर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. हा जनतेचा पैसा आहे. असा कसाही खर्च करून नाही चालणार, गरजेचा खर्च करावा. त्याची माहिती सर्वांना समजली पाहिजे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in