..तर मुंबई महापालिकेत 'आरपीआय'चा महापौर होईल...

Ramdas Athawale : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच शिवाजी पार्कवर सभा घेण्याचा नैतिक अधिकार...
Ramdas Athawale Latest News
Ramdas Athawale Latest NewsSarkarnama

पुणे : आगामी पालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष (RPI),भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसोबत युती करणार आहे. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणूक आरपीआय स्वतःच्या निवडणूक चिन्हावर लढवणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल, तसेच आरक्षण पडल्यास मुंबई पालिकेत आमचा महापौर होईल,अशी मागणी आम्ही करणार आहोत,असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. ते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी (ता.६ ऑगस्ट) पत्रकार भवनात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. (Ramdas Athawale Latest News)

Ramdas Athawale Latest News
शिंदे गटासोबत सत्तेत मात्र स्वबळाच्या तयारीला लागा; शहांच राज्यातील नेत्यांना नवं 'टार्गेट'

आठवले म्हणाले, लोकसभेसाठी आम्हाला भाजपने यापूर्वी दोन ते तीन जागा दिल्या होत्या, मात्र त्या जागांवर आम्ही निवडून आलो नाही. विधानसभेला ही आम्हाला जागा मिळतात, मात्र आमची माणसे निवडून येत नाहीत, अशी खंतही आठवलेंनी व्यक्त केली. तसेच मुंबई पालिका निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट यांच्यासमवेत आम्ही सोबत निवडणूक लढविणार आहोत. तिथे आम्ही उपमहापौर पदाची मागणी करणार असून आरक्षण पडल्यास आमचा महापौर होईल,अशी मागणीही आम्ही करणार आहोत. तर पुणे महापालिका निवडणुकीसाठी 25 जागा देखील आम्ही मागणार आहे. तसेच तिथे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे स्थानिक पदाधिकारी ठरवतील,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ramdas Athawale Latest News
राणे कुटुंबियांच्या गाडीचा अपघात...

दरम्यान, दसरा मेळावा कुणी घ्यावा याबाबत आठवले म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाढविण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे शिंदे यांनाच शिवाजी पार्कवर सभा घेण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळे मुंबई पालिका शिंदे यांनाच परवानगी देईल. तसेच १६ आमदारांबाबतच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूनेच सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेल. शिंदे यांच्या मागे दोन तृतीयांश आमदार असून खासदारही आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदेंच्याच बाजूने लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in