...तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता : उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

बाबरी मशीद पडल्यानंतर संपूर्ण देशभरात शिवसेनेची लाट उसळली होती.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : बाबरी मशीद पडल्यानंतर संपूर्ण देशभरात शिवसेनेची (shivsena) लाट उसळली होती. त्याचवेळी शिवसेनेने देशभरात सीमोल्लघंन केले असते, तर आज शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. तसेच, भाजपबरोबरच्या युतीत २५ वर्षे सडली, याचा आज पुन्हा पुनरुच्चार केला. (... then Shiv Sena would have become Prime Minister today: Uddhav Thackeray)

(स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर तब्बल दोन महिन्यांनंतर कार्यक्रमाला हजेरी लावली.

Uddhav Thackeray
काँग्रेस नगरसेवकाचा भाजपकडून सत्कार अन्‌ विष्णूअण्णांनी केलेल्या पवारांच्या त्या सत्काराची आठवण ताजी!

उद्धव ठाकरे म्हणाले की, दिल्ली काबीज करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत की नाही, हे महत्वाचे आहे. ते करणार नसू तर आपला काही उपयोग नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा दिल्लीत आपण उभा करूच. पण, कोरोनाच्या एकामागून एक लाटा येत आहेत, त्याचप्रमाणे शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही, याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातही निवडणुका लढणार आहोत. आम्ही हरू; पण लढत राहणार. दिल्ली काबीज करण्याचे आपले स्वप्न असणार आहे.

Uddhav Thackeray
शिवसेनेच्या सर्वांत तरुण नगरसेविकेकडून विजयाबद्दल मतदारांना अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’

हिंदुत्वाच्या मुद्यावर आपण भाजपसोबत होतो. त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. ते आपल्या २५ वर्षांनंतर लक्षात आलं आहे. आम्ही भाजपला सोडलं. हिंदुत्वाला नाही. आपण हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा देत राहिलो. पण ते हिंदुत्वाचा वापर स्वार्थीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. संघमुक्त भारत करू म्हणणाऱ्या नीतीशकुमारांशी भाजपने युती केली. खरे हिंदू असाल तर जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकच धोरण राबवावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

Uddhav Thackeray
राष्ट्रवादीच्या त्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारणार नाही; उलट नवी जबाबदारी देणार!

आपण भाजपवर विश्वास ठेवला; पण त्यांनी आपला विश्वासघात केला. आपल्या मदतीने त्यांनी दिल्ली जिंकली. जिंकण्यासाठी आमचाही भाजपने वापर केला. एनडीएत आता किती पक्ष राहिले आहे. पूर्वीची एनडीए आता राहिली नाही, अशा शब्दांत त्यांनी एनडीएच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com