'तर भारताचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता...'

Sanjay Raut | राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यात, हा देश विकासाच्या वाटेने, विज्ञानाच्या दिशेने पुढे नेण्यास पंडित जवाहरलाल नेहरु यांचे मोठे योगदान आहे. जर स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेने देशाला नेण्याचे काम पंडित नेहरु यांनी केलं आहे. नाहीतर या हिंदुस्तानाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता, आज पाकिस्तानची जी अवस्था आहे, धर्मांध राष्ट्र म्हणून, पण नेहरुंनी भारताचं तसं होऊ दिलं नाही, या बद्दल देश नेहरुंचा ऋणी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजप आणि मनसेने गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याविरोधात रान उठवलं. त्यातच युवासेना नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्याविरोधातही भाजपाने टीकास्त्र डागलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचंही ठाकरे गटाने स्पष्ट केल. मात्र, यानंतरही हा वाद शांत होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसताना आता या वादात सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही उडी घेतली. त्यांनी नेहरुंविषयी केलेल्या गंभीर आरोपांना संजय राऊत यांनी रणजीत सावरकरांना उत्तर देत त्यांना सल्लाही दिला आहे.

Sanjay Raut
Bharat Jodo Yatra: भाजपच्या मानातील भारत आम्ही होऊ देणार नाही ; राहुल गांधीचे थेट आव्हान

“पंडित नेहरूंनी काय केलं हे देशाला माहिती आहे. नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अशफाकउल्ला खान, मौलाना आझाद, लालबहादूर शास्त्री, वीर सावरकर या सगळ्यांचं योगदान आहे. कुणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करायचे, हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे. ही आपली परंपरा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानाला रणजीत सावरकरांनी प्रत्युत्तर देत माजी पंतप्रधान जवाहरलाल जवाहरलाल नेहरूंबाबात गंभीर दावे केले आहेत. “एका बाईसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची फाळणीला मान्यता दिली. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना पुरवली. इतकेच नव्हे तर, नेहरू आणि एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. ज्यांना आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली, हे जनतेला कळेल”, असा दावा रणजीत सावरकरांनी माध्यमांशी बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in