Bala Nandgaonkar
Bala NandgaonkarSarkarnama

Bala Nandgaonkar :...तेव्हा मलाच शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं होतं; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : ''2017 साली मी 'मातोश्री'वर दोन भाऊ एकत्र यावे, यासाठी गेलो होतो. पण...''

MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुबंई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केल्याचा एक प्रसंग सांगितला.

नांदगावकर म्हणाले, ''2017 साली मी 'मातोश्री'वर दोन भाऊ एकत्र यावे, यासाठी गेलो होतो. मात्र, यावेळी त्यांनी मलाच शिवसेनेत या, असं सांगितलं. मी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण मलाच शिवसेनेत येण्याच आवाहन त्यांनी केलं होतं. याचे साक्षिदार मिलिंद नार्वेकर, शेवाळे यांच्यासह अनेक जण होते'', असा खुलासा त्यांनी केला.

Bala Nandgaonkar
MNS : तुला काय हवंय? पक्षप्रमुख व्हायचंय हो, मुख्यमंत्री व्हायचंय हो, पण माझं..; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग

उद्धव ठाकरे यांना लहान भावाबाबत कधीही आपुलकी वाटली नाही. त्यामुळे तेव्हा मी युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो, तो त्यांनी नाकारला, असा गौप्यस्फोट नांदगावकर यांनी केला. तसेच संजय राऊत यांना राज ठाकरेंनी मोठं केलं. पण ते कधी त्यांचे झाले नाहीत, तर ते तुमचे (उद्धव ठाकरे यांचे) काय होणार?'', असा सवाल उद्धव ठाकरेंना त्यांनी केला.

Bala Nandgaonkar
Raj Thackeray : हे शिवधनुष्य एकाला झेपले नाही, माहीत नाही दुसऱ्याला तरी झेपेल का? ठाकरेंनी घेतला एका वाक्यात समाचार

''शिवसेनेतून (ठाकरे गट) नारायण राणे का बाहेर पडले?, राज ठाकरे का बाहेर पडले? असा सवाल करत जर राज ठाकरेंच्या हातात शिवसेना पक्षाची धुरा असती तर नारायण राणे बाहेर पडले नसते. एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते. 40 आमदार बाहेर पडले नसते. शिवसेनेचे खासदारही बाहेर पडले नसते. मात्र, तुम्ही आपल्याच लोकांना संपवण्याचे काम केलं'', असा घणाघात नांदगावकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com