Thackeray & Shide : राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिंदे व ठाकरे एकत्र येणार?

Balasaheb Thackeray Birth Anniversary News : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधानभवनामध्ये अनावरण सोहळा...
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

Maharashtra Politics : शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर शिवसेनेत ठाकरे व शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. यात शिंदे गट हा भाजपसोबत सत्तेत असून ठाकरे गट हा महाविकास आघाडीसह विरोधी पक्षात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडूनही एकमेकांवर वारंवार टीकाही केली जाते. पण राज्यातील सत्तांतरानंतर हे दोन्हीही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधानभवनामध्ये अनावरण होणार आहे. हा तैलचित्र अनावरण सोहळा सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देण्यात आलं आहे.

हे निमंत्रण ठाकरे यांनी स्वीकारल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, या सोहळ्याला उध्दव ठाकरे हे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. जर ते या सोहळ्याला उपस्थित राहिले तर राज्यातील सत्तांतर व शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे व ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणार आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Chinchwad- Kasaba By Election : शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र असल्यानं या सोहळ्याला उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व ठाकरे गटातील नेतेमंडळी उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, निमंत्रण पत्रिकेत ठाकरेंचा टाळलेला नामोल्लेख, शिंदे गट व ठाकरे गटातला संघर्ष, पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात ठाकरेंवरील बोचरी टीका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकरे गटाचा आज सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यामुळे विधानभवनातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला उध्दव ठाकरे जाणार नसल्याची चर्चा आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा विधानभवनातील समारंभ सायंकाळी सहा वाजता होणार असून निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. राजशिष्टाचारात ते बसत नसल्याचे विधानभवनातील उच्चपदस्थांनी सांगितले. त्यावरून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्यानं त्यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येण्याचं ठाकरे टाळणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena News: ''शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी...''; ठाकरे गटाची घणाघाती टीका

मुख्यमंत्री असताना तुमच्या वडिलांचे तैलचित्र लावू शकला नाही!

राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे. यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून या सोहळ्यावरुन भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधण्यात येत आहे. आता याच टीकेला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, अजूनही सुधारण्याचे कोणतेही लक्षण दिसत नसून गद्दार, बोके, खोके यांच्या पलीकडे एकनाथ शिंदे कोसो मैल दूर गेले आहेत. तुम्ही टोमणे मारत रहा, टीका करत रहा आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे पडलं आहे. तुम्ही अडीच वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं, २५ वर्षात मुंबईची वाट लावली. आता आम्हाला विकास करायचा आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही तुमच्या वडिलांचे तैलचित्र लावू शकला नाहीत, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com