काही डबे जोडण्याचे काम सुरू : राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य

Raj Thackeray : आगामी रणनीतीसाठी राज ठाकरे राजकीय हालचाली करत आहेत.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

मुंबई : राज्यात सत्तापरिवर्तन घडून, शिंदे-भाजप सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सगळ्याच पक्षांकडून तयारी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आगामी निवडणुकांच्या रणनीतीसाठी राजकीय हालचाली करताना दिसून येत आहेत. शिंदे गट आणि भाजपबरोबर मनसेची युतीसंदर्भात चाचपणी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. बांद्रा या ठिकाणी राज ठाकरे आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी 'तुम्ही रेल्वेने नागपूरला का जात आहात ? असा सवाल विचारल्यावर ते म्हणाले, 'सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मी रेल्वेनेच नागपूरला जातोय, असं त्यांनी आपल्या आगामी राजकीय समीकरणाबाबत सूचकपणे सांगितलं.

यावेळी राज ठाकरे यांनी मात्र आपल्या नागपूर दौऱ्याविषयी अधिक काही बोलायचे टाळले. आपल्या आगामी राजकीय भूमिका उघड केली नाही. यावेळी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. आता महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मनसेची आपल्याला कुठे कुठे आवश्यकता आहे. याबाबत भाजप आणि शिंदे गटाकडूनही जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Raj Thackeray
मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरे यांची भेट

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवास गणपतीचे दर्शनासाठी गेले होते. , भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी दिलेल्या भेटी यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे, भाजप आणि शिंदे गट असे नवे राजकीय समीकरण घडून येण्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in