राणांच्या 'त्या' फोटोवर शिवसेना आक्रमक;   
लीलावती रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली
Manisha Kayande on Lilavati Hospital, Manisha Kayande Latest News in Marathi, Navnet Rana Latest NewsSarkarnama

राणांच्या 'त्या' फोटोवर शिवसेना आक्रमक; लीलावती रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली

Shivsena-BJP Politics| Navneet Rana| किशोरी पेडणेकर आणि आमदार मनिषा कायंदे यांनी लीलावती रुग्णालयालाच धारेवर धरलं

Manisha Kayande on Lilavati Hospital

मुंबई: खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय कक्षातील फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शिवसेनेनेही हा मुद्दा लावून धरत लीलावती रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आज शिवसेना (shivsena) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) आणि आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी लीलावती रुग्णालयाला प्रशासनाला धारेवर धरलं. (Manisha Kayande Latest News in Marathi)

त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवास साधला. एमआरआय कक्षात मेटल घेऊन जाता येत नाही. पेशंटच्या हालचालींची खबरदारी घेतली जाते. असं असताना एमआरआय कक्षात जाऊन व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करणं चुकीचेच आहे. त्याविरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे, मनिषा कायंदे यांनी म्हटले.

Manisha Kayande on Lilavati Hospital, Manisha Kayande Latest News in Marathi, Navnet Rana Latest News
सोमय्या कुटुंबीयांची पोलीस ठाण्यात धाव; राऊतांच्या अडचणी वाढणार

आम्हालाही हॉस्पिटलची काळजी आहे. या रुग्णालयाचे नाव खराब होऊ नये. सरकारने त्यांना जागा दिलेली असते. पण हॉस्पिटल प्रशासनावर कोणी दबाव आणला का हा प्रश्न आहे. एमआरआय सुरू असताना स्टाफही दूर असतो. स्पीकरवर सूचना दिल्या जातात. असं असताना दरवाजा उघडा ठेवणं, फोटो काढण्यास परवानगी देणं हे सर्व गंंभीर आहे, असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलं.

नवनीत राणा (navneet rana) इकडे उपचारासाठी आल्या होत्या. इथे आल्यावर एमआरआय करतानाचे त्यांचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले. त्यांचा आजार काय होता आणि काय नाही या न्याय प्रविष्ट गोष्टी आहेत, त्यावर आम्ही बोलणार नाही. पण या हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिकापासून व्हिआयपी येतात. त्यांना नियम कडक असतात. विनाकारण फोटोग्राफी करण्यास कुणालाही परवानगी नाही.

आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही, पण हॉस्पीटल स्टाफच्या नोकऱ्या आहेत. पण त्यांच्यावर कुणी दबाव टाकला असेल तर आम्ही त्याच्या सखोल पाठपुरावा करू. उद्या कोणीही कोणतीही ट्रिटमेंट करताना फोटो काढेल. ही ब्रीच ऑफ सिक्युरीटी आणि प्रायव्हसी आहे. या हॉस्पिटलमध्ये काहीही होतं असा त्याचा अर्थ आहे, असं त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.