Maharashtra Politics : उदय सामंत, भुसे, देसाई अन् भूमरे यांना अजूनही मंत्रिपद सोडवेना!

माजी मंत्र्यांच्या ट्विटरवर अजूनही मंत्रिपदाचा उल्लेख...
Uday Samant News, Shambhuraj Desai Latest News, Dadaji Bhuse Marathi News, Sandipan Bhumre News
Uday Samant News, Shambhuraj Desai Latest News, Dadaji Bhuse Marathi News, Sandipan Bhumre NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेत भूकंप घडवून आणलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शपथविधीला आता पंधरा दिवस झाले. महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने कारभार सुरू केला. पण शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेचे राज्याचा गाडा हाकत आहेत. अद्याप इतर कोणत्याही मंत्र्यानी शपथ घेतलेली नाही. पण असं असूनही ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या आणि शिंदेंसोबत बंड केलेल्या चार मंत्र्यांना मंत्रिपद सोडवेना, असं चित्र आहे. (Maharashtra Politics Latest News)

शिंदे यांच्यासह ठाकरे सरकारमधील चार कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांनी बंड केलं. त्यांच्यासह शिवसेनेतील (Shiv Sena) एकूण 40 आमदारांनी वेगळा गट करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आव्हान दिलं. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं. राज्याच्या राजकीय इतिहासातील हे सर्वात मोठं बंड ठरलं.

Uday Samant News, Shambhuraj Desai Latest News, Dadaji Bhuse Marathi News, Sandipan Bhumre News
निलेश राणेंच्या टीकेनंतर शिवसैनिक गप्प राहिल्याने केसरकर संतापले!

सरकारमध्ये असतानाही आमदारांनी बंड करून सरकार उलथवलं. आता नवीन सरकार अस्तित्वात येऊन पंधरा दिवस झाले आहेत. मंत्रिमंडळात कुणा-कुणाला संधी मिळणार यावरून चर्चा झडत आहेत. पण शिंदे यांच्यासोबत गेलेल्या पाच मंत्र्यांनी ट्विटरवरून अजूनही मंत्रिपदाचा उल्लेख हटवलेला नाही. दादा भुसे (Dadaji Bhuse) यांच्या ट्विटर हँडलवर अजूनही ते कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री हा उल्लेख हटवलेला नाही.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणून उदय सामंत (Uday Samant) हेच मिरवत आहेत. त्यांच्या ट्विटरवरही मंत्रिपदाचा उल्लेख कायम आहे. ठाकरे सरकारमध्ये शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) गृह राज्यमंत्री (ग्रामीण) होते. तसेच त्यांच्याकडे अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क या खात्यांचाही कारभार होता. वाशिम जिल्ह्याचे ते पालकमंत्रीही होते. या सर्व पदांचा उल्लेख अजूनही ट्विटरवर आहे.

Shiv Sena MLAS Twitter
Shiv Sena MLAS Twitter

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान दिलेले संदीपान भूमरे (Sandipan Bhumre) रोजगार हमी योजना मंत्री होते. त्यांनीही ट्विटरवरून पदाचा उल्लेख काढलेला नाही. शिंदे यांच्यासोबत गेलेले गुलाबराव पाटील, अब्दूल सत्तार आणि बच्चू कडू यांनी आपल्या पदांपुढे 'माजी' असा उल्लेख केला आहे.

अजून ट्विटरवर मंत्री असलेले नेते -

शंभूराज देसाई - गृह राज्यमंत्री (ग्रामीण), अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, वाशीम पालकमंत्री

उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

दादा भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री

संदीपान भूमरे - रोजगार हमी योजना मंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com