Nashik Graduate Constituency
Nashik Graduate Constituency

Nashik Graduate Constituency : अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली अन् शुभांगी पाटील अवतरल्या...

आज सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला होता.

Nashik Graduate Constituency Election: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) अखेर नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचल्या. आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला होता. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर त्या विभागीय आयुक्त कार्यालयात हजर झाल्या.

शुभांगी पाटील यांना नॉट रिचेबल असल्याचं कारण विचारलं असता, ते मी वेळ आल्यावर बोलेल, असं सांगत त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. याच वेळी, मी माझ्या उमेदवारीवर ठाम होते. ठाकरे गटाचा, महाविकासस आघाडीचा मला पाठिंबा आहे. आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा, असा विश्वासही शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला.

Nashik Graduate Constituency
Aman Mittal News : जिल्ह्याधिकाऱ्यांच्या भेटीनं आदिवासी पाडा उजळून निघाला..

पदवीधर मतदार संघ निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत होती. अशातच शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची बातमी आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यातच भाजप शुभांगी पाटील यांना माघार घेण्यासाठई दबाव टाकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. शिवाय इतरही काही अपक्ष उमेदवारांना भारतीय जनता पक्ष माघार घेण्यासाठी रणनीती आखत असल्याचे समोर आले होते.

तोपर्यंत दुपारी एकूण चार उमेदवारांननी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल खाडे , दादासाहेब पवार आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारीवरून राजकीय नाट्य संपताना दिसत नाही, काँग्रसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असताना त्यांनी अर्ज भरला नाही. डॉ. तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अखेर अपक्ष अर्ज भरला. मात्र यानंतर आता या नाट्यात आणखी एक ट्विस्ट आले. भाजपकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवार शुभांगी पाटील यांना आता महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. यामुळे आता तांबेंना ही निवडणूक सोपी राहिली नसल्याचे बोलेले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com