५० लाख प्रकरणातील 'त्या' नेत्याने स्वीय सहाय्यकास अखेर हाकलले...

Political News : डॉक्टरने पुढे जाऊन पुन्हा बँक खात्याचे पुरावे दाखवून प्रकरण वाढवले तर काय करायचे..
Political News
Political NewsSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याच्या मुंबईस्थित शासकीय कार्यालयात 'विशिष्ट' कामासाठी दिलेले पैसे काम न झाल्यामुळे परत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या गोंधळानंतर संबंधित नेत्याने बदनामीस कारणीभूत ठरलेल्या 'त्या'स्वीय सहाय्यकास तडकाफडकी काढून टाकले आहे.

दरम्यान, 'सरकारनामा'ने गेल्याच आठवड्यात '५० लाख परत मागणाऱ्या डॉक्टरमुळे ‘पीए’सह नेत्याची झाली पंचाईत !' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त दिले होते. त्यानंतर संबंधित नेत्यांसह त्यांची कार्यालयीन यंत्रणा सुद्धा हादरुन गेली आहे. (Political News)

Political News
Political News : ५० लाख परत मागणाऱ्या डॉक्टरमुळे ‘पीए’सह नेत्याची झाली पंचाईत !

संबंधित नेतृत्व स्वच्छ प्रतिमेसाठी प्रसिद्ध असल्याने गेले काही दिवस मुंबईतील राजकीय वर्तुळात हा मोठा चर्चेचा विषय होता. भविष्यात प्रकरण आणखी शेकण्याची शक्यता आणि बदनामीचा हा'चिखल'अंगाला लागू नये यासाठी संबंधित नेत्याने दोन दिवसांपूर्वी संबंधित स्वीय सहाय्यकास तडकाफडकी आस्थापनेवरुन दूर केले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

संबंधित नेत्याच्या स्वीय सहाय्यकाने नाशिकच्या एका युनानी होमिओपॅथी डॉक्टरची केंद्रीय समितीवर सदस्य म्हणून वर्णी लावतो,असा शब्द दिला होता. त्याबदल्यात डॉक्टरने तब्बल ५० ते ६० लाख रुपये त्या स्वीय सहाय्यकाला दिले. त्यापैकी मोठा भाग बँक खात्यावर तर काही भाग रोखीने स्वीकारण्यात आला.मात्र,दोन वर्षे झाली तरी केंद्रीय समितीवर नियुक्ती न झाल्याने संबंधित डॉक्टरला आपली फसगत झाल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी डॉक्टरने काही दिवसांपूर्वी संबंधित नेत्याची मुंबईत शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. तोपर्यंत संबंधित नेते या प्रकरणाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होते. स्वीय सहाय्यकाचा हा प्रकार ऐकून नेते अवाक झाले.आपल्या माघारी घडलेल्या या प्रकाराने त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि आस्थापनेवरील अधिकाऱ्यांना विषय लवकर संपवण्याची ताकीदच दिली.

Political News
आदित्य ठाकरेंच्या राजकारणाचा 'बिहारी पॅटर्न'! तेजस्वी यादवांनंतर नितीश कुमारांचीही भेट

संबंधित नेत्यांनी त्या स्वीय सहाय्यकालाही चांगलेच झापले. तसेच घेतलेले पैसे परत करण्याची तंबी दिली. स्वीय सहाय्यकाने पैसे जसे घेतले तसे मोठा भाग बँक खात्यावर आणि काही भाग रोखीने परत करायची तयारी दर्शविली.मात्र,आता डॉक्टरने रोखीने पैसे परत करण्याची अट घातली. त्यामुळे संबंधित नेते आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही गोची झाली. रोखीने पैसे परत केले तर त्याचा पुरावा काय, असा प्रश्न निर्माण होईल.डॉक्टरने पुढे जाऊन पुन्हा बँक खात्याचे पुरावे दाखवून प्रकरण वाढवले तर काय करायचे अशा पेचाने नेत्यासह त्यांच्या स्टाफची कोंडी झाली होती.

Political News
फडणवीसांनी आदेश दिला अन् शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला...

त्यातनंतर डॉक्टरने गेल्या आठवड्यात, गुरुवारी थेट मुंबई गाठत नेत्याच्या शासकीय कार्यालयात ठिय्या मांडला.डॉक्टरच्या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची पाचावर धारण बसली होती.

यासंदर्भात 'सरकारनामा'ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यामुळे भविष्यात प्रकरण आणखी शेकण्याची शक्यता आणि बदनामीचा हा 'चिखल' अंगाला लागू नये यासाठी संबंधित नेत्याने दोन दिवसांपूर्वी संबंधित स्वीय सहाय्यकास आस्थापनेवरुन दूर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com