Uddhav Thackeray News : लोकसभेच्या तयारीत ठाकरेंनी घेतली आघाडी; पहिला उमेदवारही ठरला? पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

Amol Kirtikar News : ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांत आपला उमेदवार जवळपास निश्चित केल्याची चर्चा आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News : कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातही एक पाऊल पुढे पडले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. यामध्ये आगामी लोकसभा निवणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

या चर्चेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये आघाडी घेतली आहे. त्यांनी मुंबईतली विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. त्यानंतर ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांत आपला उमेदवार जवळपास निश्चित केल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray
BJP State Executive Meeting News : भाजपच्या ढुढ्ढाचार्यांना फडणवीसांचे राष्ट्रीय अध्यक्षांसमोरच टोले; कार्यकारिणीत काय घडले?

ठाकरे गट मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना बळ देण्याच्या तयारीत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल कीर्तिकरांना साथ द्या! असे आवाहन ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबीरात केले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) सध्या शिवसेना (शिंदे गट) आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात पिता-पुत्रांमध्येच लढाई होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जोगेश्वरी, अंधेरी, दिंडोशी, गोरेगाव विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटासोबत तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
BJP State Executive Meeting: निवडणुकांच्या तोंडावर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची होणार चांदी; पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपली ताकद वाढवा असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. भाजप (BJP) मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. भाजप नेते म्हणत आहेत मुंबईत महापौर बसवणार. पण ते कितीही म्हणाले तरी मुंबईत महापालिकेत आपलाच महापौर बसणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेल्या या संबंधीचा संभ्रम दूर करा आणि तयारीला लागा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in