Thackeray Group : शिवसेनेचा ठाकरे गट बेघर; लेखी मागणीनंतरच कार्यालय मिळणार!

Thackeray Group has no office in the legislature : ठाकरे गटाला विधिमंडळात कार्यालयच नाही...
Thackeray group
Thackeray groupSarkarnama

Budget Session 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (दि.27 फेब्रुवारी) सुरूवात झाली. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार असून 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

मात्र, ठाकरे गटाला विधिमंडळ कार्यालयच नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसण्याची वेळ आली आहे.

Thackeray group
Bacchu kadu : बच्चू कडू यांना मोठा दिलासा; न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; काय आहे प्रकरण?

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे कार्यालय हे शिंदे गटाने ताब्यात घेतले. त्यामुळे विधिमंडळात ठाकरे गटाला कार्यालय राहिले नाही.

ठाकरे गटाच्या आमदारांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे कार्यालयाची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या आमदारांना कार्यालयाची लेखी मागणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता ठाकरे गटाला नवीन कार्यालयासाठी लेखी मागणी करावी लागणार आहे. पण कार्यालय मिळेपर्यंत ठाकरे गटाला प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Thackeray group
CM : अधिकारी म्हणतो; आता नकाच देऊ पदोन्नती, मुख्यमंत्र्यांकडे अडकली होती फाईल !

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनामध्ये सरकार काय-काय महत्वाचे निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com