BJP-Thackeray Politics: फडणवीस-जयसिंघानी प्रकरण तापलं; ठाकरे गटाचा फडणवीसांना थेट इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली.
BJP-Thackeray Politics:
BJP-Thackeray Politics:Sarkarnama

Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली. या प्रकरणावरुन विधानसभेतही मोठा गदारोळ सुरु आहे. तर कालच अनिक्षाचे वडील आणि सट्टेबाज अनिल जयसिंघानीलाही अटक करण्यात आली. यावर ठाकरे गटाची युवासेना आक्रमक झाली आहे. राज्य विस्तारक शरद कोळी यांनी भाष्य करत गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.

“महाविकास आघाडी काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा देत ते चौकशीला सामोरे गेले.आता फडणवीसांनीही चौकशीला सामोरं जावं. देवेंद्र फडणवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा,अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शरद कोळींनी दिला.

BJP-Thackeray Politics:
Old Pension Scheme: जुनी पेन्शन संघटनेत फुट; संघटनेचा समन्वय समितीवर गंभीर आरोप

सट्टेबाज अनिल जयसिंघानीने २०१५ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केल्याचा त्यांच्यावर असा आरोप करण्यात येत आहे. याबद्दल आमदार आदित्य ठाकरेंना विचारलं असता, अनिल जयसिंघानी ज्या जिल्ह्यातून येतो, तेव्हा त्या जिल्हाप्रमुख कोण होते, या सर्वात मला यात जायचं नाहीये. पण याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अस आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, परवा नांदेडच्या सभेत बोलताना ठाकर गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील याच मुद्द्यावर बोट ठेवलं होते. मुंबईच्या उल्हासनगरच्या गोल मैदानात माझा भाचा श्रीकांत शिंदे याचं संपर्क कार्यालय कुणाच्या जागेत आहे हे एकदा देवेंद्रभाऊंनी चेक केलं पाहिजे. ती जागा अनिल जयसिंघानीची आहे की नाही चेक करावी, चेक करायला काही हरकत आहे का, श्रीकांत शिंदेचं संपर्क कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेत आहे का? असेल तर कसं?” असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com