Congress News : काँग्रेसची रणनीती ठरली! राज्यभर मेळाव्यांचा धडाका; राज्यात राबवणार 'कर्नाटक पॅटर्न' !

Congress Workers Meeting In Mumbai : आगामी निवडणुकांसाठी कर्नाटकी मॉडेल..
Congress Workers Meeting In Mumbai :
Congress Workers Meeting In Mumbai : Sarkarnama

Congress Workers Meeting In Mumbai : नुकतंच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भव्य दिव्य यश मिळाले. तर भाजपला येथे सपाटून मार खावा लागला. काँग्रेसच्या कर्नाटकचं विजयाचं गमक म्हणजे विविध सामाजिक घटकांना एकत्रित करून, निवडणुका जिंकण्याचं तंत्र काँग्रेसने राबविले होते. या निवडणुक कँम्पेनेच्या मॉडेलने काँग्रेसला दैदीप्यमान यश मिळवून दिले. आता हेच विजयाचं तंत्र काँग्रेस इतर राज्यातही अवलंबणार असं दिसत आहे.

Congress Workers Meeting In Mumbai :
Jitendra Awhad News : ''सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षासंदर्भात दिलेला निर्णय खोडून काढणार'', निकालाच्या आधारे आव्हाडांचा दावा

महाराष्ट्र राज्यातही हा कर्नाटकी पॅटर्न राबविण्याचं काँग्रेसचा विचार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीप्रमाणेच विविध समाजिक घटकांना एकत्रित करून, आगामी निवडणुका जिंकण्याचे कर्नाटकी पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्याचा पक्षाने आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. आणि याची सुरूवात अल्पसंख्याक समाज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यापासून करण्यात आली. आगामी निवडणुकीत विविध समाज घटकांनी काँग्रेसला साथ द्यावी, अशी साद काँग्रेसच्या नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाला घातली आहे.

कर्नाटक निवडणुकीतील काँग्रेसला मिळलेल्या भव्य दिव्य यशामुळे महाराष्ट्रातही काँग्रेस नेत्यांमध्ये व पक्षात चांगलाच उत्साह असेलला दिसून येत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती फार खालावलेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा अवघा एक खासदार आहे. तर फक्त ४४ आमदार आहेत. यामुळे काँग्रेसने आता मरगळ झटकून कामाला लागली आहे.

Congress Workers Meeting In Mumbai :
Modi Govt 9th Anniversary: भाजपच्या 50 रॅली अन् दिग्गज नेते; लोकसभेआधीच राबवणार 'हा' मास्टर प्लॅन

काँग्रेस पक्षाला विजयाकडे घेऊन जाणारे हे कर्नाटकी मॉडेल महाराष्ट्रात राज्यातही राबविण्याचे पक्षानकडून नियोजित केले गेले आहे. मुंबईतच्या दादर येथील टिळक सभागृहात काल दि. २४ मे बुधवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये मुख्य म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाची चर्चा होती. सर्व समाज घटकाने व अल्पसंख्याक समाजाने काँग्रेसला भरभरून कर्नाटकात साथ दिली याची विशेष चर्चा करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com