राज्यसरकार पोलिसांसाठी सुरु करणार नव्या योजना; वळसे पाटलांचा संकल्प

आज पोलिस वर्धापन दिनानिमित्त राज्यातील पोलिस बांधवांना शुभेच्छा गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिल्या शुभेच्छा
Dilip Walse- Patil 

Dilip Walse- Patil 

मुंबई : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या बोधवाक्याप्रमाणे अस्मानी संकटाला खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या, अहोरात्र निष्ठेने आपले कर्तव्य बजवणाऱ्या माझ्या पोलीस (Police) बांधव आणि भगिनींना महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील (Dilip Walse Patil) यांनी महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वांनी एकत्रित राहून चांगलं काम करण्याचे आवाहन वळसे-पाटीलांनी केले.

आज पोलिस वर्धापन दिनानिमित्त राज्यातील पोलिस बांधवांना शुभेच्छा देत, भविष्यात पोलीस बांधवांसाठी दुरदृष्टी ठेवत चांगल्या योजना सुरू केल्या जाणार असून याचा पोलिस बांधवांना फायदा होणार असल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमाचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे असून जेव्हा निर्बंध कमी होतील तेव्हा बैलगाडामालक बैलगाडा शर्यती भरू शकतील असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Dilip Walse- Patil&nbsp;</p></div>
मोठी बातमी! उद्यापासून शाळा, महाविद्यालये, सलून, ब्युटी पार्लर बंद

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी पोलिस दलात मेगा भरती करण्याची माहिती दिली होती. यावेळी राज्य पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचेही गृहमंत्र्यांनी मान्य केले. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये आगामी काळात 50 हजार पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. राज्याचे पोलिस दलाची ताकद वाढवण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

दिवंगत आर.आर. पाटील (R.R Patil) गृहमंत्री असताना राज्याच्या पोलिस विभागात 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यांपैकी केवळ 10 हजार पोलिसांची भरती झाली होती. आता उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती आगामी काळात होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असेही दिलीप वळसे-पाटलांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com