ओबीसी आरक्षण नाकारले जाण्याला राज्य सरकार जबाबदार

केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी ओबीसींचे आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
ओबीसी आरक्षण नाकारले जाण्याला राज्य सरकार जबाबदार
Ramdas AthawaleSarkarnama

मुंबई - ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेण्याचा ठराव राज्य सरकारने विधीमंडळात मंजूर केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत राज्यात जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी ओबीसींचे आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले आहे. ( The state government is responsible for denying OBC reservation )

रामदास आठवले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे 27 टक्के अरक्षण नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास महाराष्ट्र राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Ramdas Athawale
रामदास आठवले म्हणाले, नाना पटोले डॅशींग; दिली ‘ही’ ऑफर...

ते पुढे म्हणाले की, आम्ही न्यायालयाचा आदर करतो मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाविना घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा न्यायालयाने पुनर्विचार केला पाहिजे. राज्यसरकार तर्फे याबाबत पुन्हा अपील करून सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे या निर्णयाबाबत दाद मागून ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी आपली सूचना असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

Ramdas Athawale
रामदास आठवले म्हणाले, कोल्हेंनी माझ्या लग्नात लाडू वाटले होते...

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकारने योग्य प्रयत्न केले नाहीत. मागील 2 वर्षांचा कालावधी वाया घालवीत चुकीच्या पद्धतीने अध्यादेश काढला. ट्रिपल टेस्ट न करता ओबीसी आरक्षण अध्यादेश राज्य सरकार ने काढल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण टिकले नाही. राज्य सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे ओबीसी आरक्षण मुद्दा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय खंडपीठाकडे याबाबत दाद मागितली पाहिजे असे, रामदास आठवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.