ST Strike : सदावर्ते आणि न्यायालय हेच आमचे मालक; संघटनांची बैठक कामगारांनी नाकारली

शरद पवार (Sharad Pawar) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्यासोबत ST कामगार संघटनांच्या कृती समितीच्या बैठकीशी आमचा कोणताही संबंध नसल्याची ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी (St employees) घेतली आहे.
ST Strike
ST Strike

मुंबई : ''त्या बैठकीचे आणि आमचे काही देणेघेणे नाही त्या बैठकीला सदावर्ते नव्हते. ज्यांना आम्ही बाहेर काढले त्या रिकामी ढोबळ्यासोबत यांनी बैठक घेतली. आम्हाला विलीनीकरण हवं. बाकी काही नको, असे म्हणत आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीशी आपला काहीही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे. तसेच, कृती समितीला हे काहीही आमिष दाखवत असल्याचा आरोपही एसटी संपातील (ST Strike) कर्मचाऱ्यांनी केला आहे. (ST Strike Latest News)

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावरआज महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एस.टी. विभागातील अधिकारी, संबंधित संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीनंतर एसटी कृती समितीच्या पदाधिकांऱ्यांनी पत्रकार परिषदेत बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.

ST Strike
ST आंदोलन पेटविणाऱ्या सदावर्तेंना संघटनांचा `बाय, बाय` : तुमची गरज नाही..

एसटी विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होते. पण एसटी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आता सदावर्ते यांच्याकडून वकिली मागे घेतली असल्याची घोषणा अक्षय गुजर यांनी केली. मात्र या घोषणेला एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार देत गुणरत्न सदावर्तेच त्यांची बाजू न्यायालयात मांडतील. मंत्री अनिल परब यांच्याशी झालेल्या बैठकीशी आमचा काही संबंध नाही, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

तसेच, गुणरत्न सदावर्ते यांची एक लाख कर्मचाऱ्यांनी वकील म्हणून निवड केली आहे. कृती समितीने आमचे पुढारपण करू नये. 12 आठवडे होऊ द्या तुम्ही का घाई करता. आमचे कर्मचारी मेल्यानंतर यांना मिटिंग घेण्याची जाग आली का? असा संतप्त सवालही कर्मचाऱ्यांनी यांनी केला. तसेच, मिटिंग घ्यायची असेल तर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत घ्या. आमचे मालक फक्त न्यायलय आणि सदावर्ते आहेत. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान एसटी कृती समतिचीने सदावर्ते यांची वकिली नाकारल्यानंतर सदावर्तेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एसटी कमचाऱ्यांचा संप अजुनही सुरूचं आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनासोबत बैठक घेतली. मात्र ही बैठक म्हणजे दवाबचं राजकारण करत आहे. तसेच शरद पवार आणि अनिल परब यांनी घेतलेली ही बैठत बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला एसटी कमचारी हे अजुनही माझ्या बाजुने आहेत त्यामुळे अजुनही त्याचं वकील पत्र माझ्याकडेचं असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in