खोक्यांची टीका जिव्हारी : शिंदे गट ठोकणार २ हजार ५०० कोटींचा मानहानीचा दावा

Eknath Shinde| बंडखोर आमदारांनी पन्नास खोके (पन्नास कोटी) घेतले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
CM Eknath Shinde Latest News
CM Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Thackeray- Shinde Crises| मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना नोटीस पाठवणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. बंडखोर आमदारांनी पन्नास खोके (पन्नास कोटी) घेतले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरुन दोन दिवसांपूर्वी शिंदे गट आणि राष्ट्रवादीत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरुन आता शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा आरोपांमुळे राज्यातील जनतेच्या मनात सरकारविषयी विनाकारण संभ्रम निर्माण होत असल्याने कायदेशीर लढाईचे पाऊल उचलण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. खोके सरकार म्हणणाऱ्यांना शिंदे गटाकडून थेट मानहानीची नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच, खोक्यांवरील आरोपांचे पुरावे द्या नाहीतर माफी मागा, नाहीतर आरोप करणाऱ्यांविरोधात अडीच हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकू, असा इशाराच शिंदे गटाचे प्रवक्त्ये विजय शिवतारे यांनी दिला आहे.

CM Eknath Shinde Latest News
ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटाच्या वाटेवर? आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट...

अब्दुल सत्तार जे बोलले ते अॅक्शन ला रिअॅक्शन आहे. तुम्ही किती त्रास देणार, चिडवणार. जर तुमचे आरोप खरे असतील तर त्याचे पुरावे द्या नाहीतर कोर्टाच्या कारवाईला सामोरे जा. किंवा माफी मागा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पन्नास आमदारांचे पन्नास कोटी, असा पद्धतीने २ हजार ५०० कोटींचा मानहानीचा दावा आम्ही त्यांच्यावर ठोकणार असल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. त्यांना उद्या नोटीस दिली जाईल, असेही शिवतारे यांनी सांगितले.

राज्यातील सरकराविरोधात सातत्याने पन्नास खोक्यांवरून आरोप होत आहे. हे थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांबरोबर चर्चा करुन याविरोधात आम्ही कायदेशीर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विरोधकांच्या या आरोपांमुळे विनाकारण सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही शिवतारे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in