ठाकरेंची साथ सोडण्यासाठी शिंदे गटाकडून खासदार किर्तीकरांना होती मोठी ऑफर...

MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group| खासदार गजानन किर्तीकर हेदेखील शिवसेना सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती
MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group|
MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group|

मुंबई : शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर खासदार गजानन किर्तीकर हेदेखील शिवसेना (Shivsena) सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती. असे असतानाच किर्तीकर यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर यांनी मात्र त्यांच्या शिंदे गटात सामील होण्याला विरोध केला. मुलाच्या विरोधाने गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून गजाजन किर्तीकर यांना मोठी ऑफरही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाकडून गजाजन किर्तीकर यांना केंद्रात मंत्रीपद तर त्यांच्या मुलाला विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली. असे करुन उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे जणू स्पष्ट संकेतच दिले आहेत. त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गजानन किर्तीकर यांनीदेखील आपला निर्णय बदलत उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.

MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group|
खासदार सदाशिव लोखंडेंच्या कुंडलीत पुन्हा राजयोग?

तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांसह बंडखोरी करुन भाजपचशी हतमिळवणी केली. त्यानंतर जणू शिवसेनेला गळतीच लागली आहे. दिवसेंदिवस राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबाही मिळत आहे. तर दूसरीकडे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुंबईतील एक ज्येष्ठ खासदार शिवसेना सोडून शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु होती. खासदार गजानन किर्तीकर यांच्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीच विचारपुस केली होती. त्यानंतर त्यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे किर्तीकरदेखील शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करून चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

शिवेसना आणि उद्धव ठाकरे संकटात असताना त्यांची साथ सोडली तर देव मला माफ करणार नाही. असा निर्णय घेतला तर माझ्या सारखादुसरा मतलबी नसेल, अशी प्रतिक्रीया अमोल किर्तीकर यांनी दिली आहे. मात्र वयोमानानुसार गजानन किर्तीकर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याने रविंद्र वायकर किंवा सुनिल प्रभू यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याबाबत आग्रही होते. पण वायकर आणि प्रभू हेदेखील लोकसभेत जाण्यास इच्छूक नसल्याने शेवटी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून पुत्र अमोल किर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असेही वृत्त शिवसेनेच्या गोटातून समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in