दरोडेखोरांना वाटतं की, ते महाराष्ट्राचे लचके तोडू शकतात : सीमाप्रश्नी राऊतांचा भाजपवर हल्लाबोल!

Sanjay Raut : महाराष्ट्रातसुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकार आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेलं नसताना आता कर्नाटक सरकारने राज्याकडून नवी खुरापत सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगणार असल्याच्या विचाराबाबत कर्नाटक गांभीर्य़ाने विचार करतंय, असं वादग्रस्त विधान भाजपशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकावर बरसून टिका केली आहे.

Sanjay Raut
Aditya Thackeray Bihar Visit : आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा; एका दगडात मारले तीन पक्षी!

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर सरकार आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाला कोणती वाचा फोडली? कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि प्रंतप्रधानांशी चर्चा करणार असं त्यांनी जाहीर केलं. यानंतर लगेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा सांगितला.

कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. महाराष्ट्रातसुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकार आहे. कोणाला मुंबई तोडायची आहे, तर कोणाला महाराष्ट्र तोडायचं आहे. मुख्यमंत्री त्यांच्या चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला निघाले. देशाच्या अनेक राजकीय दरोडेखोरांना असं वाटतंय, की ते महाराष्ट्राचे लचके तोडू शकतात, अशा शब्दात त्यांनी शिंदे - भाजपवर टिका केली, अशा शब्दात राऊत यांनी घणाघात केला.

Sanjay Raut
Karnataka Border Dispute : कर्नाटकची नवी खुरापत : थेट सांगलीच्या जत तालुक्यावरच केला दावा!

नेमकं काय म्हणाले होते बसवराज बोम्मई ?

जत तालुका दुष्काळी असून, तिथे पाणी टंचाई असते. अशा दुष्काळी भागात पाणी देऊन मदत आमच्या सरकारने मदत केली. जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला. या ठरावावर आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. सीमा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील कन्नड शाळांना अनुदान देत आहोत. महाऱाष्ट्राकडून सौहार्द बिघडवण्याचा काम होत आहे.

या वक्तव्यावरून आता सीमावाद हा विषय अधिक पेट घेण्याची शक्यता आहे. यावर आता महाराष्ट्रातलं नेतेमंडळी काय भूमिका घेत आहेत. विविध नेत्यानी याबाबत प्रतिक्रिया दिली असून, याचे पडसाद उमटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in