Maharashtra Politics: एवढ्या लवकर निकाल लागणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नावाबाबत निकाल दिल्यामुळे पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर एवढ्या लवकर निर्णय येणार नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागेल असं वाटतं, असं सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या गेल्या तीन दिवसांपासून सुनावणी सुरु आहेत. ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल आज सलग तिसऱ्या दिवशी युक्तिवाद करणार आहेत. संपूर्ण राज्याचे डोळे याकडे लागले असताना अनिल देसाईंनी केलेल्या या विधानावरुन चर्चा होऊ लागल्या आहेत.

Uddhav Thackeray
Pune By-Eletion : पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी म्हणते होऊद्या खर्च: 'या' उमेदवाराकडून सर्वाधिक उधळपट्टी

तसेच, विधानसभेच्या उपाध्यक्षांना (नरहरी झिरवाळ) यांना अपात्र ठरवण्यात आलं. उपाध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवले असते तर त्यांनी हा निर्णय दिला असता. उपाध्यक्ष झिरवाळ यांनी त्यावेळी शिंदे गटाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण त्यांनी ते केलं नाही. त्यांना डिसेबल केलं गेलं, असं देसाई म्हणाले. यामुळे अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाले आहेत.

निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नावाबाबत निकाल दिल्यामुळे पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालय त्यावर कसा मार्ग काढेल हे पाहावं लागेल, असंही देसाई यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray
MCD Election: भाजप-आप नगरसेवकांमध्ये राडा ; बाटल्या फेकल्या ; महापौरांवर हल्ला..; व्हिडिओ व्हायरल

त्याचबरोबर, समता पक्षाला खतपाणी कोण घालतयं? निवडणूक आयोगाने आम्हाला मशाल चिन्ह दिलं आणि आम्ही या चिन्हावर पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. पण लोकशाहीत कोणी आडकाठी करणाऱ्यांच्या मागे कोणती शक्ती आहे. ही शक्ती खतपाणी घालतं असेल तर ते कितपत योग्य आहे. असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला.समता पक्ष कधी रजिस्टर झाला. त्यांचं चिन्ह फ्री कधी झालं? यावर निवडणूक आयोगाकडे दस्ताऐवज आहेत.पण तरीही त्यांची चिन्हासाठी धडपड सुरु आहे. पण न्यायालय ते खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com