Thorat-Patole Dispute: थोरात-पटोले वादावर तोडगा निघणार? निवडणुकांपूर्वी कॉंग्रेसमध्ये फेरबदलाची शक्यता

Congress News: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.
Balasaheb Thorat - Nana Patole
Balasaheb Thorat - Nana PatoleSarkarnama

Maharashtra Congress News : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या वाद मिटवण्यासाठी काँग्रेस प्रभारी एच के पाटील (H K Patil) यांनी थोरातांची भेट घेऊन सविस्तर चर्चाही केली.

थोरात-पटोले वादाची दखल घेत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी रमेश चेन्निथला यांची याप्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती केली आणि याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. या नाराजी नाट्याचा अहवाल तयार कऱण्यात आला असून कॉंग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा अहवाल अंतिम केला. २६ फेब्रुवारीला रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

Balasaheb Thorat - Nana Patole
Bhandara : जातीय सलोखा निर्माण करणारा ठरला राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय !

दरम्यान, या अहवालात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने काही फेरबदल होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, रायपुरच्या अधिवेशनातही महाराष्ट्रातील अंतर्गत वादाबाबत चर्चा होणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून चेन्निथला मुंबईच्या दौऱ्यावर होते. यात त्यांनी ग्रेसचे माजी मंत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आमदार, खासदारांच्या भेटीगाठी घेत त्यांची मते जाणून घेतली. काल (२१ फेब्रुवारी) नरिमन पॉईंट येथील हॉटेलमध्ये जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच बाळासाहेब थोरात यांनीही चेन्निथला यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com