
Kisan long march : गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेला शेतकरी मोर्चाला यश आले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्याने शेतकरी किसान मोर्चाने (लाल वादळ) स्थगित करुन माघारी फिरणार आहे. माजी आमदार जेपी गावित, जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. (The red storm subsided! The march was suspended as the demands of the farmers were accepted)
संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर जे.पी गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला."राज्य सरकारने (State Government) आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. म्हणून आम्ही आमचा मोर्चा मागे घेत आहोत.सरकारने आमच्या मान्य केल्याच्या निवदेनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे आम्ही हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.
जे पी गावित म्हणाले की, आज सकाळपासून आंदोनलाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत आम्हाला दिली.त्यामुळे आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत.
माजी आमदार गावित म्हणाले की, "आम्ही सतरा मागण्या केल्या होत्या, आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. यातील काही मागण्यांची एक महिन्याने अंमलबजावणी सुरु होईल. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्र सरकारकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.