कोल्हापूरच्या जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले... बाळासाहेब थोरात

थोरात म्हणाले BalasahebThorat , ''भारतीय जनता पक्षाने BJP कोल्हापुरच्या Kolhapur मतदारांवर ही निवडणूक लादली होती, जाधव कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहात महाराष्ट्राने आजवर जपलेल्या राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन भाजपने करायला हवे होते.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama

मुंबई : कोल्हापूर मधील स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले, ''भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरच्या मतदारांवर ही निवडणूक लादली होती, जाधव कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहात महाराष्ट्राने आजवर जपलेल्या राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन भाजपने करायला हवे होते. मात्र, तसे न करता वेगवेगळे आरोप करण्यात आले. ताराराणीच्या भूमीत महिला असलेल्या जयश्री ताईंचा अपमान करण्याचे पातक भाजपने केले. मात्र, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने आजच्या निकालातून भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे.''

Balasaheb Thorat
कोल्हापूरकरांनी जागा दाखवली; चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याची तयारी करावी... नाना पटोले

''मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना महाविकास आघाडीच्या सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवारही या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी, पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले, त्यांच्या एकाजुटीमुळेच हा विजय साकारला,'' असेही थोरात म्हणाले. काँग्रेस नेते तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील कोल्हापूरचे संपर्कप्रमुख मंत्री उदय सामंत आणि मंत्री हसन मुश्रीफ सतत सोबत राहिले काँग्रेसच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, अशीही भावना थोरात यांनी व्यक्त केली.

Balasaheb Thorat
कोल्हापूर पोटनिवडणुकीतील विजय धर्मांध राजकारणाला चपराक... शशीकांत शिंदे

पालकमंत्री पुरून उरले!

कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या निवडणुकीतील विजयासाठी मनापासून अभिनंदन. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. मात्र, बंटी पाटील सर्वांना पुरून उरले. आजच्या विजयाने हे अधोरेखित झाले.

Balasaheb Thorat
बलाढ्य भाजपला आस्मान दाखविलेल्या जयश्री जाधव नेमक्या आहेत तरी कोण?

विजय कै. चंद्रकांत जाधव यांना समर्पित…

कै. चंद्रकांत जाधव हे सातत्याने कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कार्यरत होते. त्यांच्या अकस्मित निधनामुळे झालेली पोटनिवडणूक काँग्रेसने विकासाच्या मुद्दयावर लढवली पण भाजपने या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापूरच्या जनतेने भाजपचा धर्मांध विचार नाकारून कोल्हापूरचा विचार हा समतेचा, प्रबोधनाचा..! आणि कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे...! आहे, हे दाखवून दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com