Mahanand Dairy Latest News : महानंद डेअरी आता NDDB च्या छत्रछायेत

आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या महानंद डेअरी वाचवण्यासाठी तिथे प्रशासक नेमण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती.
Mahanand Dairy
Mahanand DairySarkarnama

Mahanand Dairy Latest News : महानंद डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला (NDDB) ला चालवायला देणार, असल्याची माहिती राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (१३ मार्च) विधीमंडळात दिली. महानंद डेअरी सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. कामगारांचे पगार देण्यासाठीही डेअरीकडे पैसे नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ही महानंद डेअरी एनडीडीबी'ला देणार असल्याचे जाहीर केलं.

खाजगी संस्थेला किंवा कंपनीला आम्ही महानंदला देणार नाही. महानंदचे पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही एनडीडीबीलाच प्राधान्य देणारं असल्याचं पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. पण सध्या असलेल्या सर्व कामगारांना सामावून घेता येणार नाही. सुरुवातीला ९४० पैकी ३५० कामगारांनाच सामावून घेऊ, अशी अट एनडीडीबीने घातल्याची माहिती समोर आली आहे.

Mahanand Dairy
Parliament Budget Session: राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन संसदेत भाजप आक्रमक; मग खर्गेंनीही दाखवला आरसा

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभु यांनी आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या महानंद डेअरी वाचवण्यासाठी संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. यासोबतच महानंदला 100 कोटींचे आर्थिक सहाय्यही सरकारकडून दिले जावे, असही त्यांनी म्हटलं होतं.

''राज्यभरात 68 दूध संघाच्या माध्यमातून महानंदसाठी दूध संकलन केले जाते.तर मुंबईमध्ये महानंदचे दररोज वीस ते पंचवीस लाख लिटर दूध वितरीत होत होते.परंतु आज फक्त दीड लाख लिटर दूधाचे वितरण होत आहे. महानंदची दूध विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे डेअरीचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 2021मध्ये तत्कालीन कृषी मंत्र्यांनी महानंदला भेट दिली होती. तेव्हा महानंदला 25 कोटींचा तोटा होत असल्याचे सांगितले होते. पण आता तो 60 कोटींवर पोहोचला असल्याची माहिती सुनील प्रभु यांनी सभागृहात दिली होती.

इतकेच नव्हे तर, महानंदमध्ये काम करणाऱ्या 950 कर्मचाऱ्यांवरही बेकारीचे संकट ओढवले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाकडे शेतकऱ्यांचे 13 कोटी 11 लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महानंदला दूध पुरवठा करणे थांबवले आहे, याकडे प्रभू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.यामुळे या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने महानंदला दूध न पुरवणाऱ्या संघांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रभू यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in