Old Pension Scheme: जुनी पेन्शन संघटनेत फुट; संघटनेचा समन्वय समितीवर गंभीर आरोप

पूर्वलक्षी प्रभवाने जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सरकारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केलं.
Old Pension Scheme :
Old Pension Scheme :Sarkarnama

Old Pension Scheme: राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप काल (20 मार्च) मागे घेण्यात आला.पण आता कर्मचारी संघटनेतही दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. संप मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केला, असा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केला आहे. इतकचं नव्हे तर, यापुढे समन्वय समितीसोबत कुठल्याही आंदोलनात सहभागी होणार नाही, अशी भूमिकाही राज्य जुनी पेन्शन संघटनेने घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोमवारी (२० मार्च) राज्य सरकारी, निमसरकारी त्यासोबतच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूर्वलक्षी प्रभवाने जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं लेखी आश्वासन दिल्यानंतर सरकारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केलं.

Old Pension Scheme :
Prataprao Jadhav : सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याआधीच शिंदे गटाच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाले...

पण संप जाहीर करताना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी, जोपर्यंत जुनी पेन्शन योजना संदर्भात निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत संप घेतला जाणार नाही, अशी भूमिका मांडली होती. पण राज्य सरकारने कोणताही निर्णय़ घेतला नाही,केवळ आश्वासन दिले आणि त्यावरुन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी संप मागे घेऊन विश्वासघात केला, असा आरोप महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनाने केला आहे.

इतकेच नव्हे तर, यापुढे समन्वय समितीसोबत कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाहीस, अशी भूमिकाही राज्य जुनी पेन्शन संघटनेने घेतली आहे. तसेच, हा संप एका कर्मचारी संघटनेचा नव्हता तर समन्वय समितीमध्ये सर्व संघटनांनी मिळून संप पुकारला होता. त्यामुळे नाईलाजाने इच्छा नसतानाही निर्णय मान्य करावा लागल्याचं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं म्हणणं आहे. तसेच,भविष्यात जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हा लढा अधिक तीव्र करुन जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा लढा सुरु राहणार, असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com