गुड न्यूज : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य संख्या वाढणार

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे.
mantralaya
mantralayasarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) संदर्भात मोठा निर्णय घेतला. महानगर पालिकांच्या धर्तीवरच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीमध्ये सदस्य संख्या वाढविण्याबाबतच्या निर्णयाला आज (ता. २९) मान्यता देण्यात आली आहे.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. ही सदस्या संख्या वाढणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलणार आहेत.

mantralaya
निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा

सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. यामुळे पुन्हा नव्याने गटांची रचना आणि आरक्षण जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने सध्याची संख्या लक्षात घेऊन गण आणि गणांची सीमारेषा ठरविण्याचा आदेश दिला होता. हे काम अंतिम टप्प्यात असतानाच सरकारने सदस्यांची वाढविण्याचा निर्णय घेतला. महापालिका, नगरपालिका येथेही सरकारने सदस्यसंख्या या आधी वाढवली आहे.

ही संख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 अशी करण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची सध्याची संख्या 2000 वरुन 2248 इतकी होणार आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होणार आहे.

mantralaya
एसटी संपात मोठी फूट; 19 हजारांहून अधिक कर्मचारी रुजू

राज्य निवडणूक आयोग सदस्यांची संख्या निश्चित करणार आहे. एखादया जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणुकीव्दारे भरवण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण, राज्यभर सारखेच असेल. कमी लोकसंख्या असलेल्या जिल्हयांसाठी किमान 55 गट ठरविले जातील. तेथे प्रत्येक गटानुसार लोकसंख्येची जी सरासरी येईल त्यानुसार पुढील प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेऊन त्यानुसार गटांची संख्या निश्चित होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com