तारीख पे तारीख: बैलगाडा शर्यतीवरील पुढील सुनावणी 15 डिसेंबरला

2017 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती
Bullock cart race
Bullock cart race

मुंबई : बैलगाडा (Bailgada) आणि बैलगाडा शर्यती हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळयाचा विषय. पण महाराष्ट्रातील (maharashtra) बैलगाडी शर्यतीवरील (Bullock cart race) असलेली बंदी उठवण्यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आजही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या संदर्भातील पुढची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात (Maharahtra) बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाने घातलेली ही बंदी उठवावी आणि राज्यात बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी बैलगाडा मालक, संघटना आणि राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालायाच याचिका दाखल करण्यात आली होती.

Bullock cart race
`फडणविसांच ऐकलं आणि नारायण राणेंच पुण्याला येणं थांबलं`

मात्र 2017 साली मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay Hingh Court) बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ही बंदी अद्यापही कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आज होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत अनेकदा मागण्या करण्यात आल्या, ग्रामीण भागात अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाडा स्पर्धांचे आकर्षण आहे. मात्र उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्यामुळे गावच्या जत्रांमध्ये कुस्ती आणि तमाशाच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यतीही बंद झाल्या.

बैलगाडा शर्यतींमुळे घोडा आणि बैल यांच्यावर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी घोडा बैल एकाच गाडीस जुंपण्यास बंधी घातण्यात आली होती. यासोबतच शर्यतींमध्ये बैलांना चाबकाने, मोठ्या काठीने अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणे, शेपूट चावणे, असे अनेक प्रकार करून अत्याचार केले जात असल्याचा दावा केल्याने ही शर्यत बंद करण्यात आली होती.

देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडयांच्या शर्यती होतात. मात्र मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी लावण्यात आली. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात, अशी मागणी बैलगाडा मालकांकडून होत आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.आमचे मत ऐकून न घेता उच्च न्यायालयाने स्टे दिला. आता 15 तारखेला सुनावणी होईल. तीही महाराष्ट्र आणि गुजरात येथील बैलगाडा शर्यतीवर चर्चा होऊन आमच्या बाजूने निकाल लागेल. अशी अपेक्षा होती, मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. आज खिलार बैलावर चर्चा झाली. त्यासंबंधी हा बैल धावू शकतो हा एक शास्रीय अहवाल न्यायालयाला दिला आहे. ही स्पर्धा सुरू झाली नाही, तर खिलार गोवंशी नष्ट होईल, अशी भितीही महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com