'महानंदा'चे व्यवस्थापन राष्ट्रीय डेअरी बोर्डाकडे देणार ; विखे पाटलांचे संकेत!

Mahananda : महानंदाचे दैनंदिन दूध संकलन व दूध पिशवी वाटपाची क्षमता 11 लाख लिटर इतके होते. परंतु, आता मात्र ते 25 हजार लिट़र इतक्या कमी प्रमाणावर खालावले आहे.
Radhakrusna Vikhe Patil
Radhakrusna Vikhe PatilSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच 'महानंदा' डेअरी आर्थिकदृष्ट्या डबघाईला गेली आहे. दूध संकलानात सातत्याने घट होत असल्याने खर्च उचलणे आवाक्याबाहेर गेले आहे. अशा परिस्थितीत आता महानंदाची जबाबदारी नॅशनल डेअरी डेव्हलोपमेंट बोर्डाकडे (NDDB) देण्याच्या हालचालींना वेग आले आहे. 'महानंद ही संस्था चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (एनडीडीबी) देण्याचा सरकारचा विचार असल्याचे राज्याचे राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटले आहे.

Radhakrusna Vikhe Patil
पीएमएलए कोर्टाचा ईडीला दणका ; राऊतांना दिलासा, लवकरच जेलमधून घरी येणार

महानंदाचे दैनंदिन दूध संकलन व दूध पिशवी वाटपाची क्षमता 11 लाख लिटर इतके होते. परंतु, आता मात्र ते 25 हजार लिट़र इतक्या कमी प्रमाणावर खालावले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासही महानंदा अकार्यक्षम ठरत आहे. सहकारी दूध संघांचे दूध खरेदी केल्याचे वेळेवर पैसे हा महानंदाकडून अदा केली जात नाही. सर्वच दूध संघांनी महानंदाला दूध वितरण करणे बंद केले आहे.

Radhakrusna Vikhe Patil
Pune University : पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत होणार थेट लढत!

महाराष्ट्रातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था अशी ओळख असलेल्या राज्य दूध महासंघाची (महानंदा) आर्थिक अवस्था दयनीय झाली आहे. यामुळे संस्थाकडून इतर संस्ठांची वित्त देणी थकली आहेत. महानंदाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (एनडीडीबी) देण्याचा सरकार विचार करत आसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in