'राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या त्या नेत्याचा आमच्याशी संबंध नाही'; सरदार तारा सिंग यांच्या मुलाचा खुलासा

BJP-NCP Politics| Gurujyot singh| Sardar Tara singh| मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते गुरूज्योज सिंग यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
BJP-NCP Politics|
BJP-NCP Politics| Sarkarnama

BJP-NCP political news

मुंबई : मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते गुरूज्योत सिंग यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. यावेळी मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या (BJP) अनेक पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला रामराम ठोकत हातात घड्याळ बांधले. आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. (BJP-NCP Latest Marathi News)

गुरुज्योत सिंग किर यांनी आपण दिवंगत सरदार तारा सिंग यांचा नातू असल्याचं दावा केला आहे. मात्र सरदार तारा सिंग यांचे पुत्र रजनित सिंग यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच सरदार तारा सिंग यांच्या नावाचा गैरवापर करू नये, अशी मागणीदेखील केली आहे. आमदार तारा सिंग आणि गुरूज्योत सिंग यांच आडनाव वेगवेगळे आहे. माझी विनंती आहे की सरदार तारा सिंग यांच्या नावाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करु नये. तारा सिंग यांनी चाळीस वर्ष निपक्षपातीपणे राजकारणात सेवा केली. तारा सिंग यांनी प्रत्येक निवडणूकीवेळी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी आपल्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाव सादर केले आहे. गुरुज्योत सिंग भाजपचे कार्यकर्ता होते. त्यांनी सरदार तारा सिंग आणि भाजपच्या इतर नेत्यांसोबत भाजपच्या कामात सक्रीय होते.

गुरुज्योत सिंग सरदार तारा सिंग यांच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोपही रजनित सिंग यांनी केला आहे. तसेच, जर गुरुज्योत सिंग हे सरदार तारा सिंग यांचे नातू असल्याचा दावा करत असतील तर त्यांनी आमच्या कुटूबांतील सदस्य असल्याचा पुरावा आणि स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर ते आमच्या कुटूंबाच्या नावाचा गैरवापर करत असतील तर त्यांच्याविरोधात कोणती कारवाई करायची, याबाबत आम्ही कुटूंबातील सर्व सदस्य मिळून निर्णय घेणार आहोत.

गुरूज्योत सिंग हे मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूज्योत सिंग यांच्यासह भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपमधील अन्य भागातील पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com