Raut Vs Rane : ''१०४ दिवस तुरुंगात काढले, पण...''; ठाकरे गटाच्या नेत्यानं राणेंच्या 'त्या' दाव्यातली हवाच काढली

Nitesh Rane's criticism of Sanjay Raut : शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी, भाजपा असे १० पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये.
Nitesh Rane On  Sanjay Raut
Nitesh Rane On Sanjay Raut Sarkarnama

Mumbai : भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी येत्या १० जूनपर्यंत मोठा राजकीय भूकंप होणार असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पण आता राणेंच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते व संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.

सुनील राऊत(Sunil Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितेश राणेंच्या दाव्यावर भाष्य केलं. राऊत म्हणाले, ''नितेश राणे नक्की भाजपाचे आमदार आहेत का? कारण शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी, भाजपा असे १० पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये. संजय राऊत बाळासाहेबांचे भक्त आहेत. उद्धव ठाकरेंवरील निष्ठा असलेले शिवसैनिक आहेत असं सुनिल राऊत म्हणाले.

Nitesh Rane On  Sanjay Raut
Eknath Shinde on Thackeray : ''...म्हणून कर्नाटकला प्रचाराला आलो!''; ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

...पण भाजपासमोर गुडघे टेकले नाहीत!

तसेच संजय राऊतां(Sanjay Raut)नी १०४ दिवस तुरुंगात काढले, पण भाजपासमोर गुडघे टेकले नाहीत. नेपाळी नितेश राणेने शिवसेनेच्या संजय राऊतांना बोलू नये. संजय राऊत शिवसेनेचा भक्त आहे. जो जन्मलाही शिवसेनेत आणि शेवटचं आयुष्यही शिवसेनेत जाईल. नितेश राणेंना विशेष घेण्याची गरज नाही. आमचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर असलेले प्रेम, श्रद्धा हा वेगळा विषय आहे असंही सुनील राऊत यांनी यावेळी सांगितले.

Nitesh Rane On  Sanjay Raut
Sharad Pawar On Nana patole : नाना पटोलेंचा दावा पवारांनी फेटाळला; म्हणाले, मुख्यमंत्री तर...

नितेश राणे काय म्हणाले होते?

नितेश राणे(Nitesh Rane) यांनी संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणीही सुरु आहेत. ही जी माहिती मला सूत्रांनी दिली आहे असं विधान केलं होतं. यावेळी त्यांनी जर तुम्ही संजय राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीची भूमिका पाहिली किंवा त्याआधीची भूमिका पाहा ते अजित पवारांवर टीका करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची अटच अशी आहे की, अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो असं संजय राऊत यांनी शरद पवारांना सांगितलं आहे या नितेश राणेंच्या धक्कादायक दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com